दिल्लीतील बाबर रोडच्या जागी अयोध्या मार्ग? काय प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिकटवले. या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ते पोस्टर हटवले. अधिक माहितीनुसार बाबर रोडचे नाव बदलण्याची मागणी हिंदू सेनेची अनेक दिवसांपासूनची आहे. (Delhi Babar Road News:) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … The post दिल्लीतील बाबर रोडच्या जागी अयोध्या मार्ग? काय प्रकरण? appeared first on पुढारी.

दिल्लीतील बाबर रोडच्या जागी अयोध्या मार्ग? काय प्रकरण?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिकटवले. या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ते पोस्टर हटवले. अधिक माहितीनुसार बाबर रोडचे नाव बदलण्याची मागणी हिंदू सेनेची अनेक दिवसांपासूनची आहे. (Delhi Babar Road News:)
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहतील. दरम्यान, अयोध्येपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नवी दिल्लीत बाबर रोडचे नाव बदलून अयोध्या मार्ग केले. हॉटेल ललितच्या बाहेरील फलकावर त्यांनी अयोध्या मार्गाचे बॅनर चिकटवले. हे बॅनर भगव्या रंगाचे होते. एनडीएमसीने लावलेल्या साइन बोर्डवर हिंदू सेनेने हे पोस्टर लावले होते. त्याची जबाबदारी हिंदू सैन्याने घेतली होती. बाबर रोडचे नाव बदलून एखाद्या महापुरुषाचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असल्याचे हिंदू सेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
हेही वाचा 

Shiva New TV Serial : ‘शिवा’ लवकरच भेटीला, सलमानसोबत आहे खास कनेक्शन
Interfaith Marriages : आंतरधर्मीय लग्‍नासाठी धर्मांतरापूर्वी द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र : उच्‍च न्‍यायालयाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
जळगाव : फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Latest Marathi News दिल्लीतील बाबर रोडच्या जागी अयोध्या मार्ग? काय प्रकरण? Brought to You By : Bharat Live News Media.