पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन तासांत 16 आगीच्या घटना

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन तासांत 16 आगीच्या घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल 16 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशामक दलाची प्रचंड धावपळ झाली. रात्री बारापर्यंत जवान पाण्याचे बंब घेऊन शहराच्या अनेक भागांत फिरत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरची दिवाळी साजरी करता आली नाही. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. सायंकाळी 7:38 वाजता आग लागल्याचा पहिला कॉल सुरू झाला.
त्यानंतर रात्री बारापर्यंत आगीचे कॉल सुरूच होते. रात्री अकरा वाजता अग्निशामक दलाला फोन केला तेव्हा त्यांना बोलायलादेखील वेळ नव्हता, इतके कॉल येत होते. या सर्व आग फटाक्याने लागल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या आगीच्या घटना (रात्री 11 पर्यंत)
वेळ रात्री 7.38 – रास्ता पेठ, केईएम हॉस्पिटलजवळ एका इमारतीत टेरेसवर आग
वेळ रात्री 7.40 – कोथरूड, सुतार दवाखान्याजवळ दुकानामध्ये आग
वेळ रात्री 8.18 – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग
वेळ रात्री 8.24 – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचर्‍याला आग
वेळ रात्री 8.50 – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर
घरामध्ये आग
वेळ रात्री 8.52 – घोरपडी पेठ, आपला मारुती
मंदिराजवळ झाडाला आग
वेळ रात्री 8.57 – कोंढवा, शिवनेरीनगर येथे इमारतीत टेरेसवर आग
वेळ रात्री 8.58 – वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग
वेळ रात्री 9.00 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग
वेळ रात्री 9.13 – केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग
वेळ रात्री 9.27 – आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग
वेळ रात्री 9.31 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसर्‍या मजल्यावर आग
वेळ रात्री 9.32 – गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग
वेळ रात्री 9.50 – हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग
वेळ रात्री 9.51 – पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज 1 येथे घराच्या गॅलरीमध्ये आग
रात्री 10.30 – वाघोली रोड येथे ब्लु स्काय सोसायटी या दहा मजली इमारतीत एका सदनिकेत आगीची घटना; पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली.
The post पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन तासांत 16 आगीच्या घटना appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल 16 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशामक दलाची प्रचंड धावपळ झाली. रात्री बारापर्यंत जवान पाण्याचे बंब घेऊन शहराच्या अनेक भागांत फिरत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरची दिवाळी साजरी करता आली नाही. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. सायंकाळी 7:38 वाजता आग लागल्याचा पहिला कॉल …

The post पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन तासांत 16 आगीच्या घटना appeared first on पुढारी.

Go to Source