
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने दुसरे लग्न केले आहे. स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. टेनिस स्टार ‘सानिया मिर्झा’पासून वेगळे होणाच्या अफवांदरम्यान शोएब मलिकने दुसरे लग्न केले आहे. एका समारंभात शोएब आणि सना यांचा विवाह झाला. (Shoaib Malik marries Sana Javed).
सानियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यामुळे तिच्या आणि मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले होते. सानियाने लिहिले होते- ‘लग्न करणे कठीण आहे, घटस्फोट घेणे कठीण आहे, तुम्ही यातील पर्याय निवडा. लठ्ठपणा कठीण आहे, तंदुरुस्त राहणे कठीण आहे, तुमचे यातील निर्णय निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे, आर्थिकदृष्ट्या ठीक राहणे कठीण आहे, आपला निर्णय निवडा. एखाद्याशी बोलणे कठीण आहे, न बोलणे कठीण आहे, आपले कठीण निर्णय निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल, परंतु आपण आपले कठीण निवडू शकतो. सानियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या कोटमध्ये लिहिले आहे – शहाणेपणाने निवडा. (Shoaib Malik marries Sana Javed)
ही पोस्ट चर्चेत असताना शोएब मलिकने इन्टाग्रामवर पोस्ट करत अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची माहिती दिली आहे.
Pakistani cricketer Shoaib Malik ties the knot with Pakistani actress Sana Javed.
(Pics: Shoaib Malik’s ‘X’ account) pic.twitter.com/6dvgDazWru
— ANI (@ANI) January 20, 2024
हेही वाचा :
Ramesh Chennithala : भाजपकडून जात, धर्माच्या नावावर दुफळी निर्माण : रमेश चेन्नीथला
Nashik Forest Guard Recruitment : वनरक्षकासाठी पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांची पात्रता चाचणी
Surat-Chennai Greenfield : नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर, तीन गावांतून 40 हेक्टरचे अधिग्रहण
Latest Marathi News ‘सानिया’पासून वेगळे होत शोएब मलिकने केले दुसरे लग्न Brought to You By : Bharat Live News Media.
