पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय, पतीने समुद्रात बुडवून मारले

मडगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या पोटच्याच मुलाला यमसदनी पाठविणाऱ्या सुचना सेठचे प्रकरण ताजे असताना दक्षिण गोव्याच्या प्रसिद्ध काब दि राम समुद्रात पतीनेच आपल्या पत्नीला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिक्षा गंगवार (वय २७) असे मृत महिलेचे नाव असून ती लखनऊ येथील रहिवासी आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पती गौरव कटियार याला पोलिसांनी अटक केली आहे.
विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून त्याने दिक्षाचा खून केल्याची शंका आहे. गौरव हा एका तरांकित हॉटेलमध्ये बड्या हुद्द्यावर कामाला आहे. आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत, असा संशय त्याला आला होता. तिचा काटा काढण्यासाठी त्याने तिला काब दि राम येथील समुद्र किनाऱ्यावर आणले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार बराच वेळ दोघेही किनाऱ्यावर भांडत होते. लोक पाहत असल्याने गौरवने तिला किनाऱ्यावर असलेल्या दगडाच्या आड नेवून मारहाण केली. तसेच तिला पाण्यात बुडवले. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण काही पर्यटकांनी केले असून सोशियल मीडियावर ते व्हायरल झाले आहे. दिक्षा हिला पाण्यात बुडवल्यानंतर बराच वेळ गौरव समुद्र किनाऱ्यावर फिरत होता.
हेही वाचा :
मुलीच्या विवाहाचे यजमानपद भूषविले आईने
पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन ओमनी कार जळून खाक
शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन, कारवाईचे निर्देश
Latest Marathi News पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय, पतीने समुद्रात बुडवून मारले Brought to You By : Bharat Live News Media.
