सेन्सेक्स, निफ्टी सपाट, आज कोणते शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन : बँका आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी आणि सकारात्मक जागतिक संकेतादरम्यान आज शनिवारी सकाळी भारतीय शेअर बाजार तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ७२ हजारांवर वर गेला. तर निफ्टी २१,६९० पार झाला. त्यानंतर काहीवेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सेन्सेक्स आज ७२ हजारांवर खुला झाला. त्यानंतर तो ७१,६९६ पर्यंत खाली आला. … The post सेन्सेक्स, निफ्टी सपाट, आज कोणते शेअर्स तेजीत? appeared first on पुढारी.

सेन्सेक्स, निफ्टी सपाट, आज कोणते शेअर्स तेजीत?

Bharat Live News Media ऑनलाईन : बँका आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी आणि सकारात्मक जागतिक संकेतादरम्यान आज शनिवारी सकाळी भारतीय शेअर बाजार तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ७२ हजारांवर वर गेला. तर निफ्टी २१,६९० पार झाला. त्यानंतर काहीवेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले.
सेन्सेक्स आज ७२ हजारांवर खुला झाला. त्यानंतर तो ७१,६९६ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, कोटक बँक, भारती एअरटेल हे सर्वाधिक वाढले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर कोल इंडिया, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स घसरले आहेत.
बाजारातील तेजीत बँका आणि फायनान्सियल स्टॉक्स आघाडीवर आहेत. निफ्टी बँक ०.३० टक्क्यांनी वाढून ४६,००२ वर पोहोचला. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ३८ टक्क्यांनी वाढून २०,५०३ वर गेला.
शेअर बाजाराला शनिवारी सुट्टी असते. पण स्टॉक एक्स्चेंज बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) ने या शनिवारची शेअर बाजारासाठी असलेली सुट्टी रद्द केली. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी आज विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले आहे.
Latest Marathi News सेन्सेक्स, निफ्टी सपाट, आज कोणते शेअर्स तेजीत? Brought to You By : Bharat Live News Media.