पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, ओमनी कार जळून खाक

जळगांव : Bharat Live News Media वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. सट्टा पट्टा, अवैध वाळू वाहतूकीसह शहरात अवैध गॅस भरणा केंद्रे सुरू आहेत. पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ एका केंद्रात गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटात ओमनी कारसह सिलेंडर जळून खाक झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा प्रशासन अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अवैध भरणा केंद्रांचा उत आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आयजी बी जी शेखर यांच्या पथकाने पारोळा तालुक्यातील म्हसवे गावात रेड टाकून अवैध गॅस भरणा केंद्र व सिलेंडर जप्त केले होते.
दि. 19 रात्री पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे अवैधरित्या गॅस भरणाऱ्या स्टेशनवर गॅस भरण्यासाठी आलेल्या मारुती ओमनी मध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलेंडर देखील फुटले व गॅस भरण्यात येणाऱ्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या. हा स्फोट इतका भीषण होता की एक ते दीड किलोमीटर दुरून आगीचे लोड दिसत होते. पारोळा एरंडोल येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर रात्री नियंत्रण मिळवले.
ज्या गावात अवैध गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते त्याच गावात अवैधरीत्या गॅस भरताना स्फोट झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती का !माहिती होती तर मग का कारवाई केली नाही! पोलीस कोणाच्या सांगण्यावर या अवैध धंद्यांना संरक्षण देत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश देत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आणि मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आ चिमण आबा पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत. विभागीय आयुक्त l राधाकृष्ण गमे यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत पारोळा पोलिसांशी संपर्क साधला असता या घटनेबाबत तपास सुरू असून सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत कोणत्याही गुन्हा नोंद करण्यात नसल्याची माहिती देण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे संबंधित ठाणे अमलदार यांनी सांगितले.
हेही वाचा :
श्रीराम दर्शनाच्या आमिषाने महिलेला अडीच लाखाला गंडा
यूएईच्या शाही परिवाराची डोळे दिपवणारी संपत्ती
Nashik Drugs : एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात
Latest Marathi News पारोळ्याजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, ओमनी कार जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.
