राज्यातील पोलिसांच्या रजा २८ पर्यंत रद्द

नवी मुंबई; राजेंद्र पाटील,  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी राज्य पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक सुट्टीसह सर्व रजा २८ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी संध्यकाळी घेतला. (Maratha Reservation) मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून २० जानेवारी … The post राज्यातील पोलिसांच्या रजा २८ पर्यंत रद्द appeared first on पुढारी.

राज्यातील पोलिसांच्या रजा २८ पर्यंत रद्द

नवी मुंबई; राजेंद्र पाटील,  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी राज्य पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक सुट्टीसह सर्व रजा २८ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी संध्यकाळी घेतला. (Maratha Reservation)
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनात सुमारे तीन कोटी मराठे सामील होतील, असे जरांगेनी स्पष्ट केले होते. हे आंदोलक मुंबईत २६ जानेवारी रोजी पोहोचणार आहेत. आंदोलकाच्या मार्गावर राज्यातील पोलीस आयुक्त, अधीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे जिल्हा युनिट, वाहतूक पोलीस लक्ष ठेवून आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुरेपर
काळजी पोलीस दलाकडून घेतली जात आहे.
Latest Marathi News राज्यातील पोलिसांच्या रजा २८ पर्यंत रद्द Brought to You By : Bharat Live News Media.