Dhangar Reservation : सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी (दि. 18) इंदापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला 100 टक्के प्रतिसाद मिळाला, तर पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको करण्यात आला.
धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, राज्य सरकारने तातडीने आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर चंद्रकांत वाघमोडे हे मागील 10 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर शहरात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी छोटे- मोठे व्यावसायिक यांनी आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून या मागणीला पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या वेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको झाल्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पाडुळे, पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर शहरासह टोलनाक्यावरदेखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
हेही वाचा
Crime News : व्यापार्याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा
Pune News : बंधार्यावरून प्रवास ठरतोय धोकादायक
Sugarcane Andolan : कोल्हापुरात ऊसदर आंदोलन तीव्र; स्वाभिमानीचा चक्काजाम
The post Dhangar Reservation : सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको appeared first on पुढारी.
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी (दि. 18) इंदापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला 100 टक्के प्रतिसाद मिळाला, तर पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाला एनटी …
The post Dhangar Reservation : सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको appeared first on पुढारी.