कोल्हापूर : गांधीनगरमध्ये अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार

गांधीनगर; Bharat Live News Media वृत्तसेवा : एका सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१९) दुपारी उघडकीस आला. दरम्यान, हा निंदनीय प्रकार समजताच, संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ बंद ठेवून प्रक्षुद्ध जमाव गांधीनगर पोलीस ठाण्यासमोर जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराबद्दल गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडेपाटील, शिरोली एमआयडीसीचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज गिरी, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करपे घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलीस ठाण्यासमोर आणताच जमावाने त्याला शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपीचा मित्र जमावाच्या दिशेने दगड घेऊन धावला. त्या दगडाचा मार एकाला बसला. त्यामुळे जमाव आणखी संतप्त झाला. दगड फेकणार्याला जमावाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस कर्मचारी शंकर सदाशिव सुतार व कुंदन काळे यांनी मार खात असलेल्या मुलास वाचविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या कर्मचार्यांच्या पोशाखावर रक्त उडाले.
दरम्यान रात्री उशिरा आमदार ऋतुराज पाटील व गोकुळ दूध संघाच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली आणि पोलिसाने आरोपीवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. जमावाला शांततेचे आवाहन केले.
हेही वाचा :
Beed News: आष्टीजवळ दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीसमोर महिलेवर अत्याचार
भंडारा : जेल समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध, चिमुकलीचा मृत्यू
सिंधुदुर्ग : टस्करकडून फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये घबराट
Latest Marathi News कोल्हापूर : गांधीनगरमध्ये अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार Brought to You By : Bharat Live News Media.
