फ्रेंच राष्ट्रपती मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : India Republic Day : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे असतील. त्यानिमित्ताने कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये फ्रान्समधील ९५ सदस्यांचे मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यांचे बँड पथकही सहभागी होईल. तर, विमानांच्या चित्तथरारक कसरतींमध्ये देखील भारतीय हवाई दलाच्या विमानासोबत एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रेंच हवाई दलाची … The post फ्रेंच राष्ट्रपती मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी appeared first on पुढारी.

फ्रेंच राष्ट्रपती मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : India Republic Day : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे असतील. त्यानिमित्ताने कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये फ्रान्समधील ९५ सदस्यांचे मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यांचे बँड पथकही सहभागी होईल. तर, विमानांच्या चित्तथरारक कसरतींमध्ये देखील भारतीय हवाई दलाच्या विमानासोबत एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांबाबत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांची आज पत्रकार परिषद झाली. त्यात फ्रेंच राष्ट्रपती आणि फ्रेंच पथकाबाबत माहिती देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी विकसीत भारत आणि भारत – लोकशाहीची जननी या दोन संकल्पना असतील आणि यंदाचे संचलन महिला केंद्रीत असेल. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील तुकड्यांचा त्याचप्रमाणे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा देखील संचलनामध्ये समावेश करण्यात आला असल्याकडे संरक्षण सचिवांनी लक्ष वेधले.
संचलनाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होईल आणि ते सुमारे ९० मिनिटे चालेल. त्यासाठी यावर्षी १३ हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे संरक्षण सचिव म्हणाले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या व्यक्तींचा या अतिथींमध्ये समावेश असल्याचे सांगताना संरक्षण सचिव म्हणाले,की व्हायब्रंट गावांचे सरपंच, स्वच्छ भारत अभियान, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील महिला कर्मचारी, इस्रोच्या महिला अंतराळ शास्त्रज्ञ, योग शिक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते आणि पॅरालिम्पिक पदक विजेते सर्वोत्कृष्ट बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात संदर्भ आलेल्या व्यक्तींनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या सर्व प्रमुख अतिथींची पंतप्रधान मोदी २४ जानेवारीला त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतील.
यंदाच्या संचलनात २५ चित्ररथ
यंदाच्या संचलनात २५ चित्ररथ असतील. त्यातील १६ चित्ररथ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे आहेत. तर उर्वरित नऊ चित्ररथ मंत्रालयांचे असतील. यामध्ये महाराष्ट्राच्याही चित्ररथाचा समावेश आहे. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संरक्षण मंत्रालयातर्फे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे.
Latest Marathi News फ्रेंच राष्ट्रपती मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी Brought to You By : Bharat Live News Media.