…तर सांगलीच्या खासदारांच्या उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू? : विशाल पाटील

विटा: पुढारी वृत्तसेवा : भाजपने जर गेल्या दहा वर्षात खूप कामे केली आहेत, असा त्यांचा दावा आहे, तर मग सांगलीच्या विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू झाल्या आहेत, असा सवाल काँग्रेसचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील गावांचा दौरा विशाल पाटील यांनी सुरू केला आहे. लेंगरे जिल्हा … The post …तर सांगलीच्या खासदारांच्या उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू? : विशाल पाटील appeared first on पुढारी.

…तर सांगलीच्या खासदारांच्या उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू? : विशाल पाटील

विटा: Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपने जर गेल्या दहा वर्षात खूप कामे केली आहेत, असा त्यांचा दावा आहे, तर मग सांगलीच्या विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू झाल्या आहेत, असा सवाल काँग्रेसचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील गावांचा दौरा विशाल पाटील यांनी सुरू केला आहे. लेंगरे जिल्हा परिषद गटाचा दौरा झाल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी ते म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत चांगले वातावरण आहे. भाजप, महायुतीला लोक वैतागले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला पोषक आहे. उलट भाजप मध्येच गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. त्यांनी गेल्या १० वर्षात मोठमोठ्या बाता मारण्याशिवाय काहीही केलेले नाही. येथील खासदारांबाबत लोकांत प्रचंड नाराजी आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्वाबाबत वाद होता, त्याची काही कारणेही होती. परंतु गेल्या पाच वर्षात आम्ही जिल्ह्यातील सगळ्यांनी मिळून तो जाणीवपूर्वक मिटवलेला आहे. विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मानून आम्ही सर्वांनी पुढे जायचा निर्णय घेतला आहे. अनेक उपक्रम एकत्रित राबविले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार देणार, अशी चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने महेश खराडे यांचे नाव पुढे  आले आहे, याबाबत विशाल पाटील म्हणाले, अद्याप राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी बाबत महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये येण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. हा आमचा संपर्क दौरा आहे. ज्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम असेल. त्या ठिकाणी त्याला उमेदवारी हे सर्वसाधारणपणे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे धोरण ठरलेले आहे. त्यामुळे उमेदवारी फायनल झाली की तुम्हाला सगळे चित्र स्पष्टपणे दिसेल, असे पाटील म्हणाले.
विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या एकूण धोरणांबाबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या दोन दिवसांत आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो, तिथे आम्हाला यंदाची लोकसभा निवडणुक लोकच हातात घेत आहेत, असे दिसत आहे. हे सरकार नको, असे लोकांनीच आता ठरवले आहे. सरकार विरुद्धच्या हा रोष फक्त आम्हाला एकत्र करायचा आहे, त्यात जितके आम्ही यशस्वी होऊ, तितके जास्तीचे यश आम्हाला मिळणार आहे.
विटा शहराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की, आता या ठिकाणी तुम्हाला कमी लोक दिसता आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी आमचे काम सुरू आहे. अचानक निरोप मिळाल्यामुळे काही लोकांना उपस्थित राहता आले नाही. परंतु, पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतील.  यावेळी गजानन सुतार, मनोज देवकर, चंद्रकांत चव्हाण, निखिल सुतार, सिकंदर जमादार आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

सांगली : बाप तुरुंगात, आईचा मृत्यू; अन् खेळायच्या-बागडायच्या वयात दोन चिमुरडी झाली अनाथ
सांगली : विटा नगरपालिका तिसरी; मिळाले एक कोटींचे बक्षीस
सांगली : बिऊर – विश्रामबाग येथील जवान तेजस मोरे यांना अखेरचा निरोप

Latest Marathi News …तर सांगलीच्या खासदारांच्या उमेदवारी बदलाच्या चर्चा का सुरू? : विशाल पाटील Brought to You By : Bharat Live News Media.