जालना: अंतरवाली सराटीत पोलीस छावणी; १४०० पोलिसांचा बंदोबस्त

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (दि.२०) मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. १४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे वाटप पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मोर्चात हजारो वाहने आणि लाखों मराठा बांधव सहभागी … The post जालना: अंतरवाली सराटीत पोलीस छावणी; १४०० पोलिसांचा बंदोबस्त appeared first on पुढारी.

जालना: अंतरवाली सराटीत पोलीस छावणी; १४०० पोलिसांचा बंदोबस्त

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (दि.२०) मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. १४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे वाटप पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मोर्चात हजारो वाहने आणि लाखों मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी अंतरवाली सराटीत येणाऱ्या मार्गावर तसेच मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, यांच्यासह पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाचे २०० जवान, केंद्रीय राखीव दलाचे १०० जवान, शीघ्र कृती दलाचे १०० जवान, दंगा नियंत्रण पथकाचे २०० जवान, स्टारकींग १० आणि ७०० पोलिस कर्मचारी, २०० होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा 

Manoj Jarange-Patil: मुंबईला येऊन मराठ्यांनो संधीचे सोनं करा : मनोज जरांगे- पाटील
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण मसुद्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारला कळवणार : मनोज जरांगे- पाटील
Manoj Jarange-Patil : अंतरवाली ते मुंबई असा असणार मनोज जरांगे -पाटील यांचा प्रवास

Latest Marathi News जालना: अंतरवाली सराटीत पोलीस छावणी; १४०० पोलिसांचा बंदोबस्त Brought to You By : Bharat Live News Media.