बीड: आष्टीजवळ दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीसमोर महिलेवर अत्याचार

आष्टी, Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदनगरवरून गावाकडे दुचाकीवरून जाताना तीन अज्ञातांनी रस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर ३८ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या दरम्यान नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर घडली. महिला व तिच्या पतीवर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. Beed News
आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले एक दाम्पत्य गुरूवारी कामानिमित्त अहमदनगरला गेले होते. रात्री उशिरा गावाकडे येत असताना बीड- नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर अज्ञात तिघा जणांनी दुचाकी अडवत दाम्पत्याला बेदम मारहाण करून महिलेवर अत्याचार केला. ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. Beed News
पुढील तपास अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे करत आहेत.
हेही वाचा
बीड: मराठा आंदोलकांसाठी कोळगावसह ५० गावे अन्नदानासाठी सज्ज
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील हायप्रोफाइल कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा
बीड: माजलगाव येथील शिवसैनिक सतीश बोठे यांचा अपघाती मृत्यू
Latest Marathi News बीड: आष्टीजवळ दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीसमोर महिलेवर अत्याचार Brought to You By : Bharat Live News Media.
