NZvsPAK T20: पाकिस्तानचा चुराडा, न्यूझीलंडचा विजयी चौकार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs PAK T20 : क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान किवींनी पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम खेळताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 18.1 षटकांत 3 गडी गमावून 159 धांचे … The post NZvsPAK T20: पाकिस्तानचा चुराडा, न्यूझीलंडचा विजयी चौकार! appeared first on पुढारी.

NZvsPAK T20: पाकिस्तानचा चुराडा, न्यूझीलंडचा विजयी चौकार!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : NZ vs PAK T20 : क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान किवींनी पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम खेळताना पाकिस्तान संघाने 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 18.1 षटकांत 3 गडी गमावून 159 धांचे विजयी लक्ष्य गाठले. किवी फलंदाज डॅरिल मिशेलला (नाबाद 72) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. किवी गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानला सुरुवातीपासूनच धक्के देण्यास सुरुवात केली. सईम अयुब अवघी एक धाव काढून बाद झाला. मॅट हेन्रीने त्याची विकेट घेतली. यानंतर पॉवरप्लेमध्ये बाबर आझम आणि रिझवानने वेगवान फलंदाजी केली. दोघांनी 51 धावांची भागिदारी केली. पण सातव्या षटकात 56 धावांवर बाबर आझम (19) बाद झाला. यानंतर फखर जमानही (9) लगेच तंबूत परतला. विकेट्सची पडझड सुरू असताना रिझवानने एक टोक धरून ठेवले आणि 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने इफ्तिखार अहमद (10) सोबत 5व्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. (NZ vs PAK T20)
18व्या षटकात इफ्तिखार बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद नवाजने 9 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या आणि धावसंख्या 150 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशाप्रकारे किवी संघाला 159 धावांचे लक्ष्य मिळाले. रिझवान 63 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लोकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅडम मिलनेने एक विकेट घेतली. (NZ vs PAK T20)
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात किवींना अवघ्या 10 धावांमध्ये दोन मोठे धक्के दिले. उत्कृष्ट फॉर्मात असलेला फिन ऍलन 4 चेंडूत 8 धावांवर तर टीम सेफर्ट खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर 20 धावसंख्येवर आफ्रिदीने विल यंगलाही (4) आपला शिकार बनवले. (NZ vs PAK T20)
संकटात सापडलेल्या न्यूझीलंडला डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने सांभाळले. या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली आणि 19 व्या षटकात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मिचेलने 44 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने 52 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 70 धावा केल्या.
मिचेल आणि फिलिप्स यांच्यात नाबाद 139 धावांची भागीदारी झाली, जी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील पाकिस्तानविरुद्धची संयुक्त दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. त्याने हॅरी ब्रूक आणि बेन डकेट या इंग्लंडच्या जोडीची बरोबरी केली आहे. या दोघांनी 2022 मध्ये कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 139* धावा जोडल्या होत्या. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचे फलंदाज मार्टिन गुप्टिल आणि केन विल्यमसन यांच्यातील भागिदारीचा आहे. ज्यांनी 2016 मध्ये हॅमिल्टनमध्ये 171* धावांचे योगदान दिले होते.
Latest Marathi News NZvsPAK T20: पाकिस्तानचा चुराडा, न्यूझीलंडचा विजयी चौकार! Brought to You By : Bharat Live News Media.