WTC गुणतालिकेत मोठा बदल! विंडिजच्या पराभवाचा इंग्लंडला फायदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Point Table : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धची अॅडलेड कसोटी 10 गडी राखून जिंकली. या विजयासह कांगारूंनी दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेतही मोठा बदल झालेला आहे. AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाने उडवला वेस्ट इंडिजचा धुव्वा, ॲडलेड कसोटी 10 विकेट्स राखून … The post WTC गुणतालिकेत मोठा बदल! विंडिजच्या पराभवाचा इंग्लंडला फायदा appeared first on पुढारी.

WTC गुणतालिकेत मोठा बदल! विंडिजच्या पराभवाचा इंग्लंडला फायदा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : WTC Point Table : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धची अॅडलेड कसोटी 10 गडी राखून जिंकली. या विजयासह कांगारूंनी दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेतही मोठा बदल झालेला आहे.

AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाने उडवला वेस्ट इंडिजचा धुव्वा, ॲडलेड कसोटी 10 विकेट्स राखून जिंकली

विंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. अशातच ॲडलेड कसोटी जिंकल्यानंतर या संघाने गुणतालिकेतील आपले अव्वल आणखी मजबूत झाले केले आहे. 9 सामन्यांत 6 विजय मिळवून कांगारूंच्या विजयाची टक्केवारी आता 61.11 वर पोहोचली आहे. भारतीय संघ 4 सामन्यांत 2 विजय मिळवून 54.16 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. विंडिजची 8 व्या स्थानावर घसरण झाली आहे. कॅरेबियन संघाला तीन सामन्यांत 2 पराभव स्विकारावे लागले आहेत. तर त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यांची गुणांची टक्केवारी 11.11 आहे. (WTC Point Table)
दरम्यान भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघ आता 7व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लिश संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून यातील 2 सामने जिंकले असून 2 गमावले आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी 15 आहे.

‘हॅलो, आयझॅक न्यूटन?…’ : विराट कोहलीचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा असे का म्‍हणाले?

दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, पाक सहाव्या स्थानी (WTC Point Table)
आपण डब्ल्यूटीसी 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये द. आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. यातील एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी 50 असून हा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 36.66 टक्केवारीसह सहाव्या स्थानी आहे.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. या संघाच्या विजयाच्या टक्केवारीचे खाते अद्याप उघडलेले नाही. डब्ल्यूटीसीच्या तिसर्‍या आवृत्तीत श्रीलंकेने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि दोन्हीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Latest Marathi News WTC गुणतालिकेत मोठा बदल! विंडिजच्या पराभवाचा इंग्लंडला फायदा Brought to You By : Bharat Live News Media.