
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक रोहित शेट्टी ( Rohit Shetty ) अॅक्शनपट निर्मिती करण्यासाठी परिचित आहे. विशेष म्हणजे, ‘सिंघम’, ‘सिंघम- २’, ‘सिंबा’ या पोलिसपटांची निर्मिती त्याने केली आहे. या सिनेमांना चांगले यश मिळाले आहे. आता तो ‘सिंघम अगेन’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. रोहितने या सिनेमाच्या माध्यमातून आपली एक पोलिस फोर्स तयार केली आहे.
संबंधित बातम्या
Alia Bhatt- Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’ च्या इंटिमेंट सीन्सबाबत रणबीर बोलायचा आलियाशी!
अजय देवगण-ज्योतिकासोबत आर माधवन घेऊन येतोय “शैतान”
Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)
या फोर्सची सुरुवात अभिनेता अजय देवगणे याने ‘सिंघम’ पासून सुरुवात केली. त्यानंतर रणवीर सिंगचा ‘सिंबा’, अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमांचा समावेश आहे. आता ‘सिंघम अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून हे तिघेही एकत्र येत आहेत. या फोर्समध्ये टायगर श्रॉफचीही एन्ट्री झाली आहे.
रोहित दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ ही वेबसीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय पोलिस अधिकायांच्या भूमिकेत आहेत. या सीरिजच्या प्रमोशन कार्यक्रमात रोहितला एका चाहत्याने विचारले, की ‘भविष्यात तीनही खानपैकी कोणत्या खानला तुमच्या ‘पोलिस फोर्स’ मध्ये सामील कराल?’ यावर रोहित म्हणाला की, मी आमीर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनाही घेईन. ( Rohit Shetty )
Latest Marathi News रोहित शेट्टीच्या ‘ पोलिस फोर्स’ मध्ये तीन खानांची एन्ट्री? Brought to You By : Bharat Live News Media.
