रत्नागिरी : बोंड्ये येथे भीषण आगीत घर जळून खाक

साडवली : Bharat Live News Media वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये गावातील विजय पांचाळ यांच्या घराला भीषण आग लागली. ही घटना आज (दि.१९) सकाळी १० च्या सुमारास घडली. आगीत घर जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
आग लागल्यानंतर तात्काळ देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाने घटनास्थळी दाखल होत बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी मदत केली. मात्र, तोपर्यंत आगीत घर जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा
रत्नागिरी : मार्लेश्वर यात्रोत्सवाची आंगवली येथे घरभरणीने उत्साहात सांगता
रत्नागिरी : आमदार राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा उत्साहात
Latest Marathi News रत्नागिरी : बोंड्ये येथे भीषण आगीत घर जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.
