माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर..; पीएम मोदी झाले भावूक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रे-नगर येथे बांधण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) सोलापुरात आले आहेत. या घरांच्या लोकार्पणावेळी त्यांनी आपल्या लहानपणी आपल्यालाही असे घर मिळाले असते तर असे म्हणत ते भर सभेत बोलताना भावूक झाले. (PM Modi Solapur Visit) मोदी यांनी या घरांचे … The post माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर..; पीएम मोदी झाले भावूक appeared first on पुढारी.

माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर..; पीएम मोदी झाले भावूक

सोलापूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रे-नगर येथे बांधण्यात आलेल्या 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) सोलापुरात आले आहेत. या घरांच्या लोकार्पणावेळी त्यांनी आपल्या लहानपणी आपल्यालाही असे घर मिळाले असते तर असे म्हणत ते भर सभेत बोलताना भावूक झाले. (PM Modi Solapur Visit)
मोदी यांनी या घरांचे लोकार्पण केल्यानंतर घरांची पाहणीही केली. घरांची पाहणी केल्यानंतर मोदी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आले, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये घरांचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांना आपल्या लहानपणाची आठवण झाली. जर आपल्या लहानपणी असे घर मिळाले असते तर असे सांगत मोदी थोडावेळ भावुक झाले.
सोलापूरच्या चादरीचे केले कौतुक

सोलापूरची चादर कोणाला माहिती नाही. ती सगळ्यांना माहिती आहे. सोलापूरचे कपडे सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या कपडे शिवणार्‍यांचा कधी कोणी विचार केला आहे का? त्या कपडे शिवणार्‍यांसाठी आपण पंतप्रधान विश्‍वकर्मा योजना सुरु केली आहे. त्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
माझे जॅकेटही सोलापुरातून येते

माझ्या अंगावर जे जॅकेट आहे ते सोलापूरमधूनच येते. माझे एक सहकारी आहेत, त्यांनी अनेकवेळा सोलापूरी जॅकेट आणून दिले आहे. एकवेळी त्यांनी मला जॅकेट दिले. त्यावेळी मी त्यांना रागावलोही. पण त्यांनी सोलापूरी जॅकेट देण्याचे काही थांबविलेले नाही. त्यामुळे त्यांनी सोलापूरहून त्यांना दिलेल्या जॅकेटचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. आता सोलापूरातून जॅकेट पंतप्रधान मोदींना देणारा तो कार्यकर्ता कोण याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. (PM Modi Solapur Visit)
हेही वाचा :

कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्या : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  
Bilkis Bano case | बिल्किस बानो यांना पुन्हा दिलासा, दोषींचा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला
Ayodhya Ram Mandir Inauguration : चर्चेतील चेहरा : अरुण योगीराज

Latest Marathi News माझ्या लहानपणी असे घर मिळाले असते तर..; पीएम मोदी झाले भावूक Brought to You By : Bharat Live News Media.