चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

जळगाव- शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोदवड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे कापूस व बोरवेल मोटरचे केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शेतकऱ्याचे 46 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसांत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारामध्ये संदीप मधुकर वैष्णव या शेतकऱ्याची शेत जमीन … The post चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला appeared first on पुढारी.

चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

जळगाव- शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोदवड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे कापूस व बोरवेल मोटरचे केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शेतकऱ्याचे 46 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसांत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारामध्ये संदीप मधुकर वैष्णव या शेतकऱ्याची शेत जमीन आहे. या शेतामध्ये पत्र्याचे शेड बांधण्यात आलेले आहेत. त्यामध्ये संदीप वैष्णव यांनी पाच क्विंटल कापूस काढून ठेवलेला होता. अज्ञात चोरट्यांनी पाच क्विंटल कापूस 35 हजार रुपयांचा कापूस लंपास केला. याप्रकरणी संदीप वैष्णवी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक शशिकांत मराठे हे तपास करीत आहे.
बोदवड तालुक्यातील येवती शिवारमध्ये विनोद दत्तात्रय शिंदे या शेतकऱ्याचे शेत असून यांचे या ठिकाणी दोन बोरवेल आहेत. या दोन बोरवेल च  दोनशे फूट लांबीची केब अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी विनोद शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून बोधड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस युनूस तडवी हे करीत आहे.
हेही वाचा :

रक्षकच बनला भक्षक : बारामतीत पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 
Ram Mandir Inauguration : सायबरतज्ज्ञांचे केंद्रीय पथक अयोध्येत दाखल; सोशल मीडियाबाबत यूपी एटीएस अलर्टवर
Ram Mandir Inauguration : सायबरतज्ज्ञांचे केंद्रीय पथक अयोध्येत दाखल; सोशल मीडियाबाबत यूपी एटीएस अलर्टवर

Latest Marathi News चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला Brought to You By : Bharat Live News Media.