ऊसतोड मुकादमाकडून फसवणूक झाल्यास तक्रारी द्या : अप्पर पोलिस अधीक्षक

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजूर व मुकादम यांच्याकडून फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी एकत्रित तक्रारी पोलिसांकडे दाखल कराव्यात. पुरावे तपासून रीतसर गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित फसवणूक करणार्‍यांना पोलिसांकडून समन्स पाठविण्यात येईल. वाहतूकदारांनी एकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये, असे आवाहन बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर, … The post ऊसतोड मुकादमाकडून फसवणूक झाल्यास तक्रारी द्या : अप्पर पोलिस अधीक्षक appeared first on पुढारी.

ऊसतोड मुकादमाकडून फसवणूक झाल्यास तक्रारी द्या : अप्पर पोलिस अधीक्षक

सोमेश्वरनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : ऊसतोड मजूर व मुकादम यांच्याकडून फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी एकत्रित तक्रारी पोलिसांकडे दाखल कराव्यात. पुरावे तपासून रीतसर गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित फसवणूक करणार्‍यांना पोलिसांकडून समन्स पाठविण्यात येईल. वाहतूकदारांनी एकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये, असे आवाहन बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर, वाहतूकदार, कारखाना प्रतिनिधी यांच्यासोबत भोईटे यांनी साधला. फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी आपापल्या तक्रारी भोईटे यांच्यासमोर मांडल्या. कोट्यवधी रुपयांना चुना लागल्याने जगणे अवघड झाल्याच्या तसेच कर्जबाजारी झाल्याच्या तीव प्रतिक्रिया काही वाहतूकदारांनी दिल्या. भोईटे यांनी याबाबत वाहतूकदारांशी चर्चा केली. जळगाव जिल्ह्याच्या पोलिस अधिकार्‍यांशीही मोबाईलव्दारे त्यांनी सवाद साधला. या प्रसंगी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार पांडुरंग कान्हेरे उपस्थित होते.
कारखान्याच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचलाक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, प्रवीण कांबळे, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, सतीश काकडे, विधी सल्लागार अ‍ॅड. अभिजित जगताप, वाहतूक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
भोईटे म्हणाले की, पुरावे सादर केल्यास फसवणूक करणार्‍या मजूर व मुकादमांवर फसवणुकीचे आणि धनादेश न वटल्याचे गुन्हे दाखल करणे शक्य आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील जेजुरी, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यांत तक्रारी एकत्रित दाखल कराव्यात. काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला बोलावून तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जाईल. यासाठी पोलिसांच्या पातळीवर विशेष समितीही स्थापन केली जाईल.
हेही वाचा

रक्षकच बनला भक्षक : बारामतीत पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 
सोलापूर : पंतप्रधान मोदींनी थोपटली मुख्यमंत्री शिंदेंची पाठ
‘कृषिक’ला शेतकर्‍यांची गर्दी; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून पसंती

Latest Marathi News ऊसतोड मुकादमाकडून फसवणूक झाल्यास तक्रारी द्या : अप्पर पोलिस अधीक्षक Brought to You By : Bharat Live News Media.