द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची 25 लाखांची फसवणूक : व्यापार्‍यावर गुन्हा दाखल

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, बिरंगुडी, शेळगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची दिल्लीच्या व्यापार्‍याने फसवणूक केली. द्राक्ष व्यापार्‍याने 25 लाख 84 हजार 475 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे पथक तपासासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. श्रीकांत महावीर गायकवाड (रा. बोरी) व मोहित कुमार (रा. दिल्ली) अशी … The post द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची 25 लाखांची फसवणूक : व्यापार्‍यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची 25 लाखांची फसवणूक : व्यापार्‍यावर गुन्हा दाखल

जंक्शन : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, बिरंगुडी, शेळगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची दिल्लीच्या व्यापार्‍याने फसवणूक केली. द्राक्ष व्यापार्‍याने 25 लाख 84 हजार 475 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे पथक तपासासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. श्रीकांत महावीर गायकवाड (रा. बोरी) व मोहित कुमार (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित कुमार हा स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या मदतीने इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांची द्राक्षे विकत घेत होता.
मोहित याने बोरी परीसरातील दिलीप किसन शिंदे, सचिन लक्ष्मण शिंदे, सोमनाथ रामचंद्र धायगुडे, विजय मुकुंद शिंदे, आप्पा अनिल पाटील, मयुर चंद्रकांत पाटील, शुभम दत्तात्रेय ठोंबरे, गणेश बाळु देवकाते, मल्हारी विष्णु शिंदे, संजय भागवत लेंढे (सर्व रा. बोरी), संतोष मच्छिंद्र भरणे (रा. बिरंगुडवाडी), सतिश जगन्नाथ जाधव आणि सतिश उत्तम दुधाळ (रा. शेळगाव) यांचे द्राक्षाचे पैसे तसेच सचिन सुभाष कुचेकर यांचे 98 हजार 500 रुपयांचे द्राक्षाचे कॅरेट, सुनिल पाटोळे यांचे 27 हजार रुपयांचे द्राक्षाचे कॅरेट, दत्तात्रय शिंदे, गणेश ज्ञानदेव कचरे, एकनाथ उत्तम महानवर, अनिल रामचंद्र ठोंबरे यांचे द्राक्ष वाहतुकीचे 64 हजार रुपये न देता पलायन केले. वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी व्यापार्‍याच्या अटकेसाठी पोलिस पथक दिल्लीला रवाना केले आहे.
हेही वाचा

Nashik News : थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड
मोटारसायकल चोरट्यांची टोळी अखेर जेरबंद : यवत पोलिसांची कारवाई
Saptashurngi Gad : सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

Latest Marathi News द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची 25 लाखांची फसवणूक : व्यापार्‍यावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.