‘नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमची कारकीर्द आंबट करेल’

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजूनही वेळ गेलेली नाही दादा; नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा, असा इशारा शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांना दिला आहे. या संदर्भातील पोस्ट राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (NCP On Ajit Pawar) हे सरकार कधी घात करेल सांगता येत नाही- … The post ‘नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमची कारकीर्द आंबट करेल’ appeared first on पुढारी.
‘नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमची कारकीर्द आंबट करेल’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अजूनही वेळ गेलेली नाही दादा; नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा, असा इशारा शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांना दिला आहे. या संदर्भातील पोस्ट राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (NCP On Ajit Pawar)
NCP
हे सरकार कधी घात करेल सांगता येत नाही- शरद पवार गट
काल अजित पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारीशक्ती निर्धार मेळाव्याला उपस्थित होते. यावरून ‘भावी मुख्यमंत्री’ समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत. जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचं स्वप्न पाहत आहेत. तीच बगल घट्ट करत कधी हे सरकार तुमचाच घात करेल सांगता यायचं नाही बुवा, अशा धोका शऱद पवार गटाने अजित पवार यांना दाखवून दिला आहे. (NCP On Ajit Pawar)

दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द!
आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी?
दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात!!#NCP #Maharashtra… pic.twitter.com/UZFnqaTE9w
— NCP (@NCPspeaks) January 19, 2024

‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प का आणि कशासाठी?
अजित पवार यांनी फक्त शब्दच फिरवला नाही, तर शरद पवार यांचा विश्वास तोडलाय. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय. त्यामुळे शब्द जपून वापरायचे असतात आणि ते लक्षातही ठेवायचे असतात, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. शरद पवार गटाने दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? असा सवाल देखील अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांना केला आहे. (NCP On Ajit Pawar)
हेही वाचा:

Ayodhya Ram Mandir Inauguration : चर्चेतील चेहरा : अरुण योगीराज
PM Modi Solapur Visit | सोलापूर : असंघटित कामगारांना मिळाले हक्काचे घर, पीएम मोदींच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण
आदर्श, संस्कृती व भक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रभू श्रीराम : अश्विनीकुमार चौबे

 
Latest Marathi News ‘नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमची कारकीर्द आंबट करेल’ Brought to You By : Bharat Live News Media.