हे तर रामराज्य! तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी- पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन : दक्षिण सोलापूरच्या कुंभारी येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील १५ हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झाला. यावेळी बोलताना पीएम मोदी यांनी तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी असल्याचे सांगितले. (PM Modi Solapur Visit) पीएम आवास योजनेतर्गंत आज देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. … The post हे तर रामराज्य! तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी- पीएम मोदी appeared first on पुढारी.

हे तर रामराज्य! तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी- पीएम मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन : दक्षिण सोलापूरच्या कुंभारी येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील १५ हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झाला. यावेळी बोलताना पीएम मोदी यांनी तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी असल्याचे सांगितले. (PM Modi Solapur Visit)
पीएम आवास योजनेतर्गंत आज देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. आज १ लाखांहून अधिक कुटुंबाचा गृह प्रवेश होत आहे. यामुळे मला खूप आनंद होत असल्याची भावना पीएम मोदी यांनी व्यक्त केली. या गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव असल्याचे सांगत पीएम मोदी यावेळी भावूक झाले.
आज एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी आहे. लाखो रुपयांची घरे ही तुमची संपत्ती आहे. ज्या कुटंबांना आज घर मिळाले आहे त्यांनी अनेक पिढ्या कष्ट झेलले. आज कामगारांना घर मिळत आहे याचा मला मोठा आनंद असल्याचे ते म्हणाले.
आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांचे पालन करून देशात चांगले प्रशासन व्हावे आणि देशात प्रामाणिकपणाचे सरकार व्हावे. हे रामराज्य आहे ज्याने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि प्रत्येकाच्या प्रयत्नाला प्रेरणा दिली.
२०१४ मध्ये आमचे सरकार स्थापन होताच मी म्हणालो होतो, ‘माझे सरकार गरिबांना समर्पित सरकार आहे.’ त्यामुळे आम्ही एकापाठोपाठ एक योजना लागू केल्या ज्यामुळे गरिबांच्या अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल. (PM Modi Solapur Visit)
पीएम मोदींचा विरोधकांवर निशाणा
आपल्या देशात दीर्घकाळ गरिबी हटावचा नारा दिला गेला पण गरिबी काही हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. मध्यस्थ त्यांच्या हक्काचे पैसे लुटायचे, असे सांगत पीएम मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हमारी सरकार पहले दिन से प्रयास कर रही है कि श्रीराम के आदर्शों पर चलते हुए देश में सुशासन हो, देश में ईमानदारी का राज हो।
ये रामराज्य ही है जिसने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की प्रेरणा दी है।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/GHtbLkgf0e
— BJP (@BJP4India) January 19, 2024

Latest Marathi News हे तर रामराज्य! तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी- पीएम मोदी Brought to You By : Bharat Live News Media.