सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ मराठी ओटीटीवर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून चंदेरी दुनियेत अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टार जितेंद्रने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेला जितेंद्रचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ रसिक प्रेक्षकांना १२ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. संबंधित बातम्या – ‘स्वराज्याच्या मातीत दडलेला अंगार…’; सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा … The post सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ मराठी ओटीटीवर! appeared first on पुढारी.
सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ मराठी ओटीटीवर!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून चंदेरी दुनियेत अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टार जितेंद्रने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेला जितेंद्रचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ रसिक प्रेक्षकांना १२ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या –

‘स्वराज्याच्या मातीत दडलेला अंगार…’; सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा ‘बहिर्जी’

Sunil Shetty : अभिनेता सुनील शेट्टी उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनाला (Video)

priyanka chopra- Malti : दिलवाला स्वेटर अन् क्यूटनेस…; प्रियांका-निकच्या मुलगी मालतीची एल्मो थीम

मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर दाखविणारी निर्माती-अभिनेत्री म्हणजेच सुषमा शिरोमणी. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सना मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याचा मोह त्यांनी निर्माण केला. त्यांच्या अनेक मसालेदार सुपरहिट चित्रपटांपैकी असलेला दत्ता केशव दिग्दर्शित आणि बॉलिवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे मराठीत पदार्पण करणारा अभिनेते डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, उषा चव्हाण आणि सुषमा शिरोमणी अभिनित ‘मोसंबी नारंगी’ हा आठवणीतला चित्रपट आता खास अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रसिकांना पहायला मिळणार आहे.

बैलांच्या शर्यतीत हरल्याने मंबाजी सुडेच्या भावनेने रघुजीच्या कुटुंबावर हल्ला करतो. जिथे रघुजीच्या दोन मुली मोसंबी आणि नारंगी विभक्त होतात. पत्नी मरण पावते आणि त्याची स्मरणशक्ती नष्ट होते. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा दोन्ही मुली रघुजीकडे परत येतात तेव्हा काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Latest Marathi News सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ मराठी ओटीटीवर! Brought to You By : Bharat Live News Media.