जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

ज्यो. मंगेश महाडिक
मेष : प्रेमी आज आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता.
वृषभ : अप्रत्यक्ष मदत करण्याच्या वृत्तीमुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्वापासून तुम्ही मुक्त व्हाल. मन आनंदी राहील.
मिथुन : प्रेमात पडला आहात! अपेक्षित असलेली कौतुकाची थाप मिळेल. पारितोषिके देण्याचा कार्यक्रम पुढे ढकलल्याने निराश व्हाल.
कर्क : वातावरणउत्साही बनेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. महत्त्वाच्या नात्यांना वेळ द्या.
सिंह : कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंद आणि दुःखात सामील व्हा. त्यामुळे त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल.
कन्या : आजचा दिवस आनंदमय असेल. कामाबाबत प्रामाणिक राहा. दृढनिश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
तूळ : संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. घरातील सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत व्हाल.
वृश्चिक : आज तुम्हाला जादूई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.
धनु : स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा अद्भुत दिवस. कामाच्या निमित्ताने बाहेर जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी पैशाला सांभाळावे.
मकर : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
कुंभ : घरगुती प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे. प्रेमाचा आनंद घेता येईल. वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटेल.
मीन : कृतज्ञता व्यक्त करत पुढे चला. छोटेसे भावप्रदर्शनदेखील सर्वांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही खुमारी वाढवणारी असते.
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.
