गर्भगृहातील सिंहासनावर श्री रामलल्ला विराजमान!

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत मंगळवारी सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या तिसर्‍या दिवशी, गुरुवारी श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात (गाभार्‍यात) दाखल झाली असून, सिंहासनावर विराजमान आहे. सोन्याच्या रामयंत्रावर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारीच ही मूर्ती मंदिर संकुलात आणण्यात आली होती. मकरानाच्या पांढर्‍या संगमरवराने बनवलेले हे सिंहासन गुरुवारी धन्य झाले. मूर्ती 200 किलो वजनाची असल्याने सिंहासनावर बसविण्यास 4 … The post गर्भगृहातील सिंहासनावर श्री रामलल्ला विराजमान! appeared first on पुढारी.

गर्भगृहातील सिंहासनावर श्री रामलल्ला विराजमान!

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत मंगळवारी सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या तिसर्‍या दिवशी, गुरुवारी श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात (गाभार्‍यात) दाखल झाली असून, सिंहासनावर विराजमान आहे. सोन्याच्या रामयंत्रावर मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
बुधवारीच ही मूर्ती मंदिर संकुलात आणण्यात आली होती. मकरानाच्या पांढर्‍या संगमरवराने बनवलेले हे सिंहासन गुरुवारी धन्य झाले. मूर्ती 200 किलो वजनाची असल्याने सिंहासनावर बसविण्यास 4 तास लागले. क्रेनच्या मदतीने ती गर्भगृहात आणली गेली होती. तत्पूर्वी, मूर्तीची विशेष पूजा झाली. आता अधिवास विधींतर्गत मूर्ती सुगंधित जलात ठेवण्यात आली असून, रात्रभर रामलल्ला
जलाधिवासात राहतील. नंतर धान्य, फळ आणि तुपात मूर्ती ठेवली जाईल. मूर्ती पूर्णपणे झाकलेली असून, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच आवरण काढले जाईल. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिराचा कळस कापडाने तयार केला जात आहे.
हनुमानगढी आणि श्रीराम मंदिराकडे जाणार्‍या रामपथ या जन्मभूमी मार्गावर यूपी एटीएसच्या 150 वर कमांडोज्नी पथसंचलन केले.
श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून ‘राम की पैडी’ येथे महापौर गिरीशपती त्रिपाठी यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली 4 हजार महिलांनी विशेष पूजा केली.
सर्व रेल्वेस्थानकांवर थेट प्रसारण
देशभरातील सर्व रेल्वेस्थानकांवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रसारण होणार आहे. आजअखेर 9 हजार स्क्रीन त्यासाठी बसविण्यात आले आहेत.
Latest Marathi News गर्भगृहातील सिंहासनावर श्री रामलल्ला विराजमान! Brought to You By : Bharat Live News Media.