नागपूर : शेकोटी जीवावर उठली, झोपडीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपुरात सध्या कडाक्याची थंडी असल्याने घरी पेटवलेली शेकोटी जीवावर उठल्याची घटना गुरुवारी (दि. १८) रात्री साडेदहाच्या सुमारास गिट्टीखदान परिसरात घडली. या घटनेत दोन भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हात शेकण्यासाठी ही शेकोटी पेटवण्यात आली होती. यावेळी वडील कामासाठी बाहेर गेले तर आई शेजारी गेली होती.अशावेळी झोपडीला आग लागली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एक मुलगी घराच्या बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र दोन चिमुकले होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला. देवांश वय3 वर्षे व प्रभास वय 2 वर्षे अशी त्यांची नावे आहेत. दिपाली उईके असे आईचे तर रंजीत उईके असे वडिलांचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.
Latest Marathi News नागपूर : शेकोटी जीवावर उठली, झोपडीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
