‘२० जानेवारीपर्यत ५४ लाख प्रमाणपत्र द्या नाहीतर..’ जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : ५४ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करा, मग सगे-सोयऱ्यांचा वटहुकूम काढा. सरकार हैद्राबाद संस्थान, सातारा संस्थान व मुंबई गॅझेट का स्वीकारत नाही. त्यांना ते मान्य नाही का? मग नागपूर करार कसा मान्य होतो. तोही रद्द करा? असे मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगत सवाल उपस्थित केला. तसेच  २० जानेवारीपर्यंत ५४ लाख … The post ‘२० जानेवारीपर्यत ५४ लाख प्रमाणपत्र द्या नाहीतर..’ जरांगे पाटलांचा सरकारला इशारा appeared first on पुढारी.
‘२० जानेवारीपर्यत ५४ लाख प्रमाणपत्र द्या नाहीतर..’ जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वडीगोद्री; Bharat Live News Media वृत्तसेवा : ५४ लाख मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करा, मग सगे-सोयऱ्यांचा वटहुकूम काढा. सरकार हैद्राबाद संस्थान, सातारा संस्थान व मुंबई गॅझेट का स्वीकारत नाही. त्यांना ते मान्य नाही का? मग नागपूर करार कसा मान्य होतो. तोही रद्द करा? असे मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगत सवाल उपस्थित केला. तसेच  २० जानेवारीपर्यंत ५४ लाख प्रमाणपत्र द्या, आमच्यावर मुंबईला येण्याची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा मराठे मुंबईत आंदोलनाला बसल्यास तेथून उठणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाला दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाच्या मसुद्यातील सगे-सोयरे शब्दाबाबत सरकारला सुचवलेल्या दुरुस्तीनुसार नवीन सुधारित मसुदा घेऊन शिष्टमंडळ आज (दि.१८) अंतरवालीत दाखल झाले. आ.बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांना सुधारित मसुदा सुपूर्द केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.
यावेळी बोलताना म्हणून जरांगे म्हणाले की, ज्यांची कुणबी नोंद आढळली आहे. त्यांची यादी ग्रामपंचायतमध्ये लावा. तुम्हाला मराठवाड्याचं १८८४ चं गॅझेट मान्य नाही का? गॅझेटमध्ये मराठवड्यात एकही मराठा नाही, सगळे कुणबी आहेत. हे गॅझेट का मान्य नाही? ५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या तरच अध्यादेशाचा कागद कामाचा असेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.
यावर आ. बच्चू कडू म्हणाले की, जिथे कुणबी नोंदी सापडल्या आहेत तिथेच यादी लागेल, याद्या ग्रामपंचायतमध्ये लागल्या आहेत. गॅझेटचा विषय वेगळा आणि सग्या-सोयऱ्याचा विषय वेगळा. ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे, त्यांना अर्ज करावाच लागेल, सही करावीच लागेल तरच त्यांना प्रमाणपत्र मिळेल, असे आ. बच्चू कडू जरांगेंना म्हणाले.
प्रशासन म्हणत आहे की, गावात ग्रामपंचायतमध्ये याद्या लावल्या आहेत, अंबड तालुक्यातील वडीकाळया गावात कुणबी नोंदी सापडल्या असूनही ग्रामपंचायतमध्ये यादी लावण्यात आली नाही, असे जरांगेनी बच्चू कडू यांना सांगितले. त्यानंतर आ. कडू यांनी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना झापले. सुधारित मसुद्यावरील निर्णय शुक्रवारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला कळवतो, असे मंगेश चिवटे यांनी सांगितले. यावर जरांगे म्हणाले, २० जानेवारीपर्यत ५४ लाख कुणबी प्रमाणपत्र द्या नाहीतर तुम्हीही माझ्यासोबत मुंबईला आंदोलनात चला. आमच्यावर मुंबईला येण्याची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा मराठे मुंबईत आंदोलनात बसले तर तेथून उठणार नाहीत, असा इशाराही मनोज जरांगे यांनी मंगेश चिवटे यांना दिला.
५४ लाख मराठ्यांना त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या, किती लोकांना प्रमाणपत्र दिले याचा आकडा किती आहे याची माहिती द्या, २० जानेवारीला मराठे मुंबईला जाण्यासाठी तयार आहेत. गॅझेट हे ग्राहय धरायला तयार नसेल तर मग नागपूर करार रद्द करा, एक मंत्री माझ्यावर ट्रॅप लावत आहे. गरज पडल्यास त्याच नाव जाहीर करीन. आरक्षण दिलं तरी मुंबईला जाणार, नाही दिलं तरी जाणार असल्याचे सांगत २० जानेवारीला अंतरवालीतून मुंबईकडे निघणार, असल्याचे मनोज जरांगे – पाटील यांनी स्पष्ट केले.
याद्या लावण्यात आल्या नाहीत तर कारवाई करणार : बच्चू कडू
ज्या ज्या ग्रामपंचायतवर कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तरीही याद्या लावण्यात आल्या नाहीत. तेथील ग्रामसेवक, तहसिलदार व नायब तहसिलदार यांना निलंबित करा, त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना आ.बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांना फोनवरून दिली.
हेही वाचा :

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha : पीएम मोदींचे कठोर व्रत! 11 दिवस केवळ नारळ पाण्याचे सेवन आणि जमिनीवर निद्रा
इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे : अशोक चव्हाण यांचा दावा
Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली

Latest Marathi News ‘२० जानेवारीपर्यत ५४ लाख प्रमाणपत्र द्या नाहीतर..’ जरांगे पाटलांचा सरकारला इशारा Brought to You By : Bharat Live News Media.