रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेदिवशी किणीत हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचे पर्व

किणी; राजकुमार चौगुले : हिंदूंचा सर्वोच्च भाग्याचा क्षण २२ जानेवारी रोजी साजरा होत असतानाच रामलल्ला प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने आगळावेगळा सामाजिक सलोखा किणीत अनुभवायला मिळणार आहे. किणीच्या शेख कुटुंबीयांच्यावतीने या आनंदाप्रित्यर्थ गावाला मिष्टान्न भोजन(महाप्रसाद) देण्यात येणार आहे. श्रध्देतून होणारे अन्नदान हिंदू मुस्लिम समाजात अधिकचा गोडवा निर्माण करणारे ठरणार आहे. अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने किणी … The post रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेदिवशी किणीत हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचे पर्व appeared first on पुढारी.

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेदिवशी किणीत हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचे पर्व

किणी; राजकुमार चौगुले : हिंदूंचा सर्वोच्च भाग्याचा क्षण २२ जानेवारी रोजी साजरा होत असतानाच रामलल्ला प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने आगळावेगळा सामाजिक सलोखा किणीत अनुभवायला मिळणार आहे. किणीच्या शेख कुटुंबीयांच्यावतीने या आनंदाप्रित्यर्थ गावाला मिष्टान्न भोजन(महाप्रसाद) देण्यात येणार आहे. श्रध्देतून होणारे अन्नदान हिंदू मुस्लिम समाजात अधिकचा गोडवा निर्माण करणारे ठरणार आहे.
अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने किणी येथे गेली पंधरा दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. हजारोंच्या उपस्थितीतअक्षता कलशाची मिरवणूक काढल्यानंतर ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात दररोज सकाळी अभिषेक,दुपारी रामरक्षा स्तोत्र, रामनाम जप व स्तोत्र पठण करण्यात येत आहे.यात शेकडो महिला पुरुष सहभागी होत आहेत.रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेदिवशी २२ जानेवारीला सकाळपासून होमहवन करण्यात येणार आहे.दहा वाजल्यापासून रामरक्षा स्तोत्राचा जप, विविध भागांतील महिलांकडून वाजतगाजत येणाऱ्या ५६ भोगांची मांडणी करण्यात येणार आहेत.१२ वाजून २९ मिनिटांनी प्रतिष्ठापणेच्या अक्षता टाकून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.यानंतर गावचे दिवंगत माजी सरपंच कै. शब्बीर शेख यांचे बंधु नजीर शेख व नासिर शेख यांच्यासह इतर अन्नदात्यांच्यावतीने महाप्रसाद होणार आहे.
दरम्यान या प्रतिष्ठापणेच्या निमिताने वेगवेगळ्या धर्मापालिकडे जाऊन सामाजिक सलोखा राखणाऱ्या बातम्या येत असतानाच किणी येथेही शेख कुटुंबाने छ. शाहू महाराजांच्या विचारांना शोभेल असा आदर्श घालून दिला.कै. महंमद शेख नेहमी सर्वच धार्मिक कार्यात अग्रेसर असायचे. त्यांचे चिरंजीव कै शब्बीर शेख यांनी गावचे सरपंचपद भूषविले, त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अबिदाबानू यांनीही ग्रामपंचायत सदस्यपद भूषविले. रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेचा मुहूर्त जाहीर होताच शेख कुटुंबियानाही आनंद झाला.किणी येथील कार्यकर्ते त्यांना या सर्व कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यासाठी गेले असता नजीर शेख व नासिर शेख यांचेसह त्यांच्या कुटुंबीयांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग म्हणून महाप्रसाद देण्याची इच्छा असल्याचे सांगितले.त्यानुसार हा महाप्रसाद शेख कुटुंबियांच्यावतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला.सामाजिक सलोखा जपणाऱ्या या शेख कुटुंबाच्या निर्णयाचे स्वागत सर्वत्र होत आहे.

प्रभू श्रीराम संपूर्ण भारतीयांचे दैवत आहे, मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने हिंदू बांधव व मुस्लिम बांधव यांच्यात सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्याची सुवर्णसंधी मिळाली.यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.असा सलोखा सर्वत्र निर्माण होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.
नासिर महंमद शेख, उद्योजक

Latest Marathi News रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणेदिवशी किणीत हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचे पर्व Brought to You By : Bharat Live News Media.