अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Arvind Kejriwal vs ED : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) उपस्थित राहण्यास नकार दिला. केजरीवाल यांच्या या उत्तरानंतर आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. केजरीवाल यांना अटक होणारच असा दावा भाजपने केला. तर ईडीचे समन्स भाजप … The post अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली appeared first on पुढारी.

अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Arvind Kejriwal vs ED : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) उपस्थित राहण्यास नकार दिला. केजरीवाल यांच्या या उत्तरानंतर आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. केजरीवाल यांना अटक होणारच असा दावा भाजपने केला. तर ईडीचे समन्स भाजप मुख्यालयातून तयार होतात, असे जोरदार प्रत्युत्तर आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज (दि. 18) ईडीने चौथ्यांदा समन्स पाठवला. मात्र पुन्हा एकदा केजरीवाल यांनी ईडीसमोर चौकशीसाठी जाणे टाळले. ईडी मला नक्की कोणत्या भूमिकेतून चौकशीसाठी बोलवत आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा केजरीवाल यांनी ईडीला विचारला. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. केजरीवाल यांना दिल्लीतील मद्यधोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक होणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत वेगवेगळे कारण देत ईडीसमोर उपस्थित राहण्याचे टाळले आहे. अरविंद केजरीवाल हे आर्थिक गैरव्यवहार करण्यात उत्कृष्ट पुरस्कार मिळवू शकतात, असाही टोला गौरव भाटिया यांनी लगावला. (Arvind Kejriwal vs ED)
त्यानंतर, केजरीवाल यांना पाठवलेले समन्स बेकायदेशीर आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी केला. अरविंद केजरीवाल यांना अटक करून लोकसभेच्या प्रचारापासून रोखण्यासाठी ही भाजप आणि केंद्र सरकारची रणनीती आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ईडी कोणाला समन्स पाठवणार आहे, ईडी काय करणार आहे हे भाजपाला आधी माहिती असते. भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करते. भाजपच्या मुख्यालयातच ईडीचे समन्स तयार केले जातात, असाही आरोप अतिशी यांनी केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पाठवलेल्या समन्स सोडून पुन्हा एकदा आपविरुद्ध भाजपमध्ये जुंपली आहे. (Arvind Kejriwal vs ED)
छगन भुजबळांवर कारवाई थांबली
आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. महाराष्ट्रातील नेते छगन भुजबळ याचे उत्तम उदाहरण आहेत. अनेक गैरव्यवहार त्यांच्या नावाने असतानाही त्यांच्यावरील कारवाई कशी बंद झाली, असा प्रश्न आपच्या नेत्या आणि मंत्री अतिशी यांनी यावेळी विचारला.
The post अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली appeared first on Bharat Live News Media.

Go to Source