दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट; मेटे यांच्या भावाची नवी संघटना

बीड, पुढारी वृत्तसेवा : दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रामहरी मेटे यांनी रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा केली. जय शिवसंग्राम या नावाने रामहरी मेटे सक्रिय होणार आहेत. दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर रामहरी मेटे अलिप्त होते. मात्र आता शिवसेना आणि … The post दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट; मेटे यांच्या भावाची नवी संघटना appeared first on पुढारी.

दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट; मेटे यांच्या भावाची नवी संघटना

बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रामहरी मेटे यांनी रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा केली. जय शिवसंग्राम या नावाने रामहरी मेटे सक्रिय होणार आहेत.
दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर रामहरी मेटे अलिप्त होते. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत देखील फूट पडल्याचं दिसून येत आहे. रामहरी मेटे हे विनायक मेटे यांचे छोटे बंधू आहेत. ते हयात असेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्या सोबत राहून शिवसंग्रामचे काम पाहिले होते. मात्र आता शिवसंग्राम संघटनेतून काही कारणास्तव त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रायगडावरून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करत होता वेगळी वाट निवडली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसंग्राम साठी हा एक धक्का असल्याचे मानले जात आहे.
Latest Marathi News दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट; मेटे यांच्या भावाची नवी संघटना Brought to You By : Bharat Live News Media.