महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या विधानावर आक्षेप घ्यावा : राजू शेट्टी

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात महात्मा फुले जनआरोग्य योजना कर्नाटक सीमाभागातील नागरिकांसाठीही लागू केल्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, भारतात कोठेही मुक्त संचार करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. त्यामुळे असं वक्तव्य करणे चुकीचा आहे. वाशीम येथे पत्रकारांशी संवाद … The post महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या विधानावर आक्षेप घ्यावा : राजू शेट्टी appeared first on पुढारी.

महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या विधानावर आक्षेप घ्यावा : राजू शेट्टी

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात महात्मा फुले जनआरोग्य योजना कर्नाटक सीमाभागातील नागरिकांसाठीही लागू केल्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, भारतात कोठेही मुक्त संचार करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. त्यामुळे असं वक्तव्य करणे चुकीचा आहे. वाशीम येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये, असं जाहीर केलं. त्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र हा सीमावाद पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर बोलताना शेट्टी म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही भारतातच आहेत. तिथे सर्वांनाच मुक्त संचार करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. त्यामुळे असं वक्तव्य करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे या संदर्भात आक्षेप नोंदवावा असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टामध्ये 865 गावांवर महाराष्ट्राने हक्क सांगितलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेने ठराव करून ती गाव आपली आहेत असं समजून महाराष्ट्रातील सर्व सोयी सुविधा तिथे देण्याचं जाहीर केले आहे. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि इतर भरत्यांमध्ये पात्र ठरवावं अशी लक्षवेधी मी मांडली होती. त्याचा शासन निर्णय झालेला आहे. कर्नाटक सरकारला हे वाईट वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं त्यावर स्थगिती आणावी. असा विरोध मात्र चुकीचा आहे. अशी प्रखर मत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज वाशीम येथे पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.
 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये, असं जाहीर केलं आहे. त्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र हा सीमावाद पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगला तालुक्यातील एका सैनिकी शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.
Latest Marathi News महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या विधानावर आक्षेप घ्यावा : राजू शेट्टी Brought to You By : Bharat Live News Media.