
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा: अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने सर्वांनाच अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. हेच स्वप्न असलेल्या नागपूरच्या सुप्रसिद्ध भजन गायिका भाग्यश्री आणि धनश्री वाटकर या जुळ्या बहिणींना राम मंदिरात जाण्याचा बहुमान मिळाला आहे. त्या दोघी अयोध्येत राम भजन सादर करणार आहेत. (Nagpur News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरातील या भगिनी प्रसिद्ध पार्श्वगायिका लतादीदींनी गायिलेले ‘श्री राम चंद्र कृपालु .., ठुमक चलत रामचंद्र…’ अशी एकापेक्षा एक सरस भजन सादर करणार आहेत. या बहिणींनी या आधीही राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमात, दीपोत्सवात भजन सादर केले आहे.
आता पुन्हा एकदा त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येचे निमंत्रण मिळाल्याने त्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भजन सादर करणार आहेत. पाच शतकाच्या प्रतिक्षेनंतर होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्यासाठी त्या उत्सुक आहेत. त्याचबरोबर निमंत्रण मिळाल्याने त्या स्वतःला खूप भाग्यवान समजत आहेत. (Nagpur News)
हेही वाचा:
Ayodhya Ram mandir Pran Pratishtha : पीएम मोदींचे कठोर व्रत! 11 दिवस केवळ नारळ पाण्याचे सेवन आणि जमिनीवर निद्रा
व्रतस्थ रामभक्त..! झमेली बाब तब्बल ३१ वर्षांनंतर प्राणप्रतिष्ठादिनी करणार अन्नग्रहण!
Farooq Abdullaha On Ram : ‘मेरे राम, मेरे राम… ‘ ; फारूक अब्दुल्लाही झाले राम भजनात दंग
Latest Marathi News नागपूरच्या वाटकर भगिनी अयोध्येत सादर करणार ‘भजन’ Brought to You By : Bharat Live News Media.
