इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे : अशोक चव्हाण यांचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे. त्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या खेळी त्यांच्याकडून खेळल्या जात आहेत. त्याला फार महत्व देण्याची गरज नाही असा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. एकीकडे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असताना त्यांनी स्वतः अमरावतीत काँग्रेस बैठकीच्या निमित्ताने याचा इन्कार केला. … The post इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे : अशोक चव्हाण यांचा दावा appeared first on पुढारी.

इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे : अशोक चव्हाण यांचा दावा

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे. त्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या खेळी त्यांच्याकडून खेळल्या जात आहेत. त्याला फार महत्व देण्याची गरज नाही असा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. एकीकडे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असताना त्यांनी स्वतः अमरावतीत काँग्रेस बैठकीच्या निमित्ताने याचा इन्कार केला.
धाडसत्रातून विरोधकांना नामोहरम केले जात आहे का, असे विचारले असता सध्या देशात सर्वत्र या गोष्टी सुरू आहेत. जशा जशा निवडणुका येतील, तशा तशा या अनेक गोष्टी वाढणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यांनी आधी महाविकास आघाडीमध्ये यावं, त्यांना राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
कर्नाटक सीमा राज्य सरकारने आधी आपल्या सीमावर्ती भागात लक्ष दिले पाहिजे. तिथे सुविधा पोहचवल्या पाहिजे.कर्नाटकने केलेले वक्तव्य चुकीचं नाही. दरम्यान, अमरावती लोकसभा संदर्भात विचारले असता नवनीत राणा आमच्या सोबत निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. महाविकास आघाडीमधील अन्य पक्षांवर मी बोलणार नाही. मात्र,रवी राणांची काय अवस्था झाली आहे? हे लोकांना माहित आहे असेही अशोक चव्हाण म्हणाले.
Latest Marathi News इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे : अशोक चव्हाण यांचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.