एडनच्या आखातात भारतीयांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला, नौदलाचे चोख प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीयांना घेऊन जाणाऱ्या मार्शल आयलंड्स-ध्वजांकित व्यापारी जहाजावर बुधवारी रात्री समुद्री चाच्‍यांनी ड्रोन हल्‍ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जहाजाची सुरक्षितपणे सुटका केल्‍याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. आफ्रिकेतील गार्डाफूई भूशिर व अरबस्तानातील दक्षिण येमेनचा किनारादरम्यान एडनचे आखात आहे. येथे मार्शल आयलंड्स-ध्वजांकित व्यापारी जहाजावर समुद्री चाच्‍यांनी ड्रोन हल्‍ला केला. जहाजाने तत्‍काळ … The post एडनच्या आखातात भारतीयांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला, नौदलाचे चोख प्रत्युत्तर appeared first on पुढारी.

एडनच्या आखातात भारतीयांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला, नौदलाचे चोख प्रत्युत्तर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारतीयांना घेऊन जाणाऱ्या मार्शल आयलंड्स-ध्वजांकित व्यापारी जहाजावर बुधवारी रात्री समुद्री चाच्‍यांनी ड्रोन हल्‍ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जहाजाची सुरक्षितपणे सुटका केल्‍याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
आफ्रिकेतील गार्डाफूई भूशिर व अरबस्तानातील दक्षिण येमेनचा किनारादरम्यान एडनचे आखात आहे. येथे मार्शल आयलंड्स-ध्वजांकित व्यापारी जहाजावर समुद्री चाच्‍यांनी ड्रोन हल्‍ला केला. जहाजाने तत्‍काळ भारतीय नौदलाकडे मदत मागितली.  रात्री 12.30 च्या सुमारास विनाशक INS विशाखापट्टणमने एडनच्या आखातात ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत  व्यापारी जहाजाला मदत पुरवली. या जहाजावर एकूण 22 क्रू मेंबर्स होते ज्यात ९ भारतीय होते. समुद्री चाच्‍यांनी केलेल्‍या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि जहाजाची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली, अशी माहिती भारतीय नौदलाच्‍या सूत्रांनी दिली आहे.
भारतीय नौदलाच्या धडक कारवाईने जहाज सुरक्षित
संकटग्रस्त मार्शल आयलंड्स-ध्वजांकित व्यापारी जहाजाने भारतीय नौदलाकडे मदत मागितली. विनाशक INS विशाखापट्टणमने एडनच्या आखातात ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. स्फो टके हाताळण्यासाठी आणि स्फोट न झालेला शस्त्रास्त्र नष्ट करण्याचे प्रशिक्षण देण्‍यात आलेली एक विशेष टीम तयार करण्‍यात आली. समुद्री चाच्‍यांनी केलेला हल्ला परतवल्‍यानंतर आज सकाळी भारतीय नौदलाच्‍या विशेष टीमने हल्‍लाग्रस्‍त जहाजाच्‍या खराब झालेल्या भागाची पाहणी केली. नौदलाच्या म्हणण्यानुसार, तज्ञांनी कसून तपासणी केल्यानंतर जहाजाला पुढील प्रवासासाठी सुरक्षित घोषित केले. हल्‍लाग्रस्‍त जहाज मार्शल आयलंड या अमेरिकन बेटाचे आहे. हे जहाजावरील ध्वजाद्वारे सूचित केले जाते.

Navy destroyer INS Visakhapatnam responds to drone attack in Gulf of Aden
Read @ANI Story | https://t.co/4nGTHlJHNt#INSVisakhapatnam #GulfofAden #IndianNavy pic.twitter.com/okI8fgZrvq
— ANI Digital (@ani_digital) January 18, 2024

 
 
 
The post एडनच्या आखातात भारतीयांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला, नौदलाचे चोख प्रत्युत्तर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source