
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार्श्वभूमीवर देशभरातील वातावरण राममय झाले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण देशातील अनेक दिग्गज व्यक्तींना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत त्यांना हे निमंत्रण नाकारले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Prakash Ambedkar On Ram Mandir)
प्रकाश आंबेडकर यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या निमंत्रणाला उत्तर देताना म्हटले आहे की, “अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले. या सोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे आभार; परंतु या सोहळ्यात मी उपस्थित राहणार नाही कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने आयोजित केला आहे. हा धार्मिक कार्यक्रम निवडणूक फायद्यासाठीची राजकीय मोहीम बनली आहे.” (Prakash Ambedkar On Ram Mandir)
माझे आजोबा डॉ.बी.आर. आंबेडकरांनी यांनी चेतावणी दिली होती की, जर राजकीय पक्षांनी धर्म आणि पंथाला देशापेक्षा उच्च स्थान दिले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा अडचणीत येऊ शकते आणि आपण स्वातंत्र्य कायमचे गमवू शकतो. आज ही भीती खरी ठरत आहे. धर्म आणि पंथाला देशापेक्षा वर ठेवणारे भाजप आणि आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा सोहळा बळकावला आहे, असा आरोप करत ‘जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम, असा नारा प्रकाश आंबेडकर यांनी ट्रस्टला लिहलेल्या पत्रात दिला आहे. (Prakash Ambedkar On Ram Mandir)
I received an invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya.
I will NOT be attending the said event because the event has been appropriated by the BJP-RSS; a religious event has become a political campaign for electoral gains.
My grandfather Dr. B.R. Ambedkar warned… pic.twitter.com/XmK7gjbfNf
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 17, 2024
हेही वाचा:
PM Modi Issued Postal Stamps: रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा स्मरणार्थ PM मोदींच्या हस्ते ‘टपाल तिकिटं’ जारी, जगभरातील तिकिट पुस्तकाचेही प्रकाशन
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी व्हायचेय? अशी करा बुकिंग
Ayodhya Ram Mandir Updates | अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांची मूर्ती स्थापित, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा
Latest Marathi News प्रकाश आंबेडकरांना ‘प्राणप्रतिष्ठा’चे निमंत्रण, ट्रस्टला पत्राद्वारे दिले उत्तर Brought to You By : Bharat Live News Media.
