बराच काळ सिंगल होते; पण जोडीदार असणे नैसर्गिक : रकुल प्रीत सिंग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही रकुल खूपच सक्रिय असते. गेल्या काही वर्षांपासून रकुल अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. लवकरच रकुल आणि जॅकी लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांही रंगल्या आहेत. येत्या 22 फेब्रुवारीला दोघे गोव्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. आता एका मुलाखतीत रकुलने ( Rakul Preet Singh ) जॅकीसोबतच्या नात्याबाबत भाष्य केले आहे.
संबंधित बातम्या
रकुल प्रीत सिंग स्टायलिश मिनी ड्रेसने चाहत्यांना भुरळ
रकुल प्रीत सिंग ऑल-व्हाइट बॉडीकॉनमध्ये चमकत आहे
Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेला बर्मिंगहॅममध्ये सुरुवात; सिंधू-मनप्रीत यांनी केले भारतीय संघाचे नेतृत्व
रकुल म्हणाली की, मी बराच काळ सिंगल होते; पण जोडीदार असणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी खूप स्वतंत्र मुलगी आहे. बर्याच वेळा मला माझ्या सुट्टीच्या दिवशी केवळ जॅकीशी बोलण्याची इच्छा होते. जॅकी आणि मी कधीच कामावर चर्चा करत नाही. दोघांना काम आणि व्यायाम दोन्ही खूप आवडतात. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने वर्कआऊटस्, अन्न, आरोग्य आणि फिटनेसबद्दल बोलतो. तिच्या वक्तव्यामुळे आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा नेटकर्यांमध्ये रंगल्या असल्याचे दिसून येत आहे. ( Rakul Preet Singh )
Latest Marathi News बराच काळ सिंगल होते; पण जोडीदार असणे नैसर्गिक : रकुल प्रीत सिंग Brought to You By : Bharat Live News Media.
