आमदार राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल
रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : राजापूरचे आमदार राजन प्रभाकर साळवी तसेच त्यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता प्रकरणी आज (दि.१८) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्हयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकुण ३ कोटी ५३ लाख ८९ हजार ७५२ रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच ११८.९६ टक्के अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातम्या :
ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी
‘गरीबांची खिचडी ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी खाल्ली’
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसारच कार्यवाही : राहुल नार्वेकर
अपसंपदा बाबतचा समाधानकारक खुलासा सादर केला नसल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नमूद मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याचे स्वतःचे नावे मालमत्ता धारण करून कब्जात बाळगणे कामी आमदार साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिल्याबाबत त्यांची पत्नी, मुलगा यांच्यावरही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.
त्या अनुषंगाने आमदार राजन साळवी यांचे घर, हॉटेल, कार्यालय व इतर सात संबंधित ठिकाणी एकाच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घराची झडती सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई परिक्षेत्र ठाणेचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक, अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत चव्हाण यांच्या पथकामार्फत करण्यात येत आहे.
हेही वाचा :
नार्वेकरांनी ‘न्यायालया’पेक्षा आपण कसे वरचढ हे सिद्ध केले-अनिल परब
उद्धव ठाकरेंचा ‘या’ कारणावरून शिंदे गटाला पाठिंबा, म्हणाले…
Latest Marathi News आमदार राजन साळवी यांच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.