जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल!

दुबई ः संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई नगरी ही आता ‘नवलाईची नगरी’च बनलेली आहे. जगातील सर्वात उंच इमारत, पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेटं, जगातील सर्वात मोठी फुलबाग असलेली ‘मिरॅकल गार्डन’, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती…असे बरेच काही या नगरीत पाहायला मिळते. याच शहरात जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल आहे. पंचतारांकित, सप्ततारांकित वगैरे हॉटेल अनेक शहरांमध्ये आहेत. मात्र, … The post जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल! appeared first on पुढारी.

जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल!

दुबई ः संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई नगरी ही आता ‘नवलाईची नगरी’च बनलेली आहे. जगातील सर्वात उंच इमारत, पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेटं, जगातील सर्वात मोठी फुलबाग असलेली ‘मिरॅकल गार्डन’, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती…असे बरेच काही या नगरीत पाहायला मिळते. याच शहरात जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल आहे. पंचतारांकित, सप्ततारांकित वगैरे हॉटेल अनेक शहरांमध्ये आहेत. मात्र, दुबईतील हे ‘टेन स्टार’ हॉटेल जगात एकमेव आहे!
झगमगत्या दुबईत अरबी समुद्राच्या एका छोट्याशा बेटावर हे सुंदर हॉटेल आहे. त्याचे नाव आहे ‘बुर्ज अल अरब’. एका कृत्रिम बेटावरच हे हॉटेल उभे करण्यात आलेले आहे. ‘जुमेराह’च्या शेजारीच असलेले हे हॉटेल दुबईच्या शानदार क्षितिजाला ‘चार चाँद’ लावते. ते जगातील सर्वात उंच हॉटेलांपैकीही एक आहे. मात्र, तेथील 39 टक्के भाग हा राहण्यासाठी नाही. हे रिकामे मजले इमारतीच्या भव्यतेसोबतच एक अनोखी रहस्यमय हवाही देत असतात.
1999 मध्ये ज्यावेळी ‘बुर्ज अल अरब’ हे जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून समोर आले, त्यावेळी दुबईच्या शिरोपेचात आणखी एक तुरा खोवला गेला होता. या आलिशान इमारतीची निर्मिती 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच सध्याचे सुमारे 8330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून झाली होती. जुमेराह बीचपासून ते 280 मीटर अंतरावर आहे. मानवनिर्मित बेटावर असलेल्या या हॉटेलमध्ये जाण्यासाठी एका घुमावदार पुलाची निर्मिती केलेली आहे.
आपला जहाजाच्या शिडासारखा अनोखा आकार आणि भव्यता यामुळे हे हॉटेल जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेते. त्याच्या छतावर 689 फूट उंचीवर हेलिपॅडही आहे. या ‘टेन स्टार’ हॉटेलमध्ये एक रात्र मुक्काम करायचा असेल तर तब्बल दहा लाख रुपये मोजावे लागतात!
Latest Marathi News जगातील एकमेव ‘10 स्टार’ हॉटेल! Brought to You By : Bharat Live News Media.