29 वर्षांच्या तरुणीचा 75 वर्षाचा बॉयफ्रेंड!
टोरांटो ः काही जोड्या पाहिल्या की ‘प्रेम आंधळे असते’ हे पटू लागते. अशीच एक जोडी कॅनडात पाहायला मिळत आहे. तिथे 29 वर्षांची एक तरुणी 75 वर्षे वयाच्या वृद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या दोघांच्या वयामध्ये तब्बल 46 वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियात दोघांची चर्चा आहे.
प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात ते या दोघांनी सिद्ध केलेले आहे. या तरुणीचे नाव आहे फॅबिएन लाफेरियेर. तिने इतका वृद्ध बॉयफ्रेंड शोधला म्हणून अनेक लोक तिला ट्रोलही करीत आहेत. काही लोक तिला ‘गोल्ड डिगर’ही म्हणतात. तिचा डोळा या वृद्ध माणसाच्या पैशावर असल्याचा अनेकांचा समज असल्याने तिला ही बिरूद लावले जात आहे! अर्थातच तसे काही नाही. एक प्रेझेंटर आणि मॉडेल असलेल्या फॅबिएनची ही लव्ह स्टोरी एका चॅरिटी इव्हेंटपासून सुरू झाली. हा कार्यक्रम लहान मुलांसाठी होता.
या ठिकाणी फॅबिएनची भेट डेनिस नावाच्या या व्यक्तीशी झाली. ती त्यावेळी बराच वेळ त्याच्याशी बोलत होती. या कार्यक्रमाची ती मेन स्पीकर होती. डेनिससह ती यावेळी अनेक पाहुण्यांना भेटली. मात्र, डेनिसने तिचे लक्ष वेधून घेतले. ती म्हणते, डेनिसच्या मी प्रेमात पडले याचे कारण म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा दिसत होता! फॅबिएन आता या बॉयफ्रेंडसह फेसबुक लाईव्ह करते आणि टिकटॉक व अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करते.
Latest Marathi News 29 वर्षांच्या तरुणीचा 75 वर्षाचा बॉयफ्रेंड! Brought to You By : Bharat Live News Media.