अचानक लागला तळघराचा शोध; आत होती जुनी वाहने!

रोम ः अनेक लोकांना काही इमारतींमध्ये अचानकच काही लपलेल्या खोल्या, तळघर सापडत असतात. इटलीतील मॅपल्स शहरातही असाच प्रकार घडला. तेथील एका व्यक्तीला अचानकच असे एक भले मोठे तळघर सापडले. तो त्याच्या घराजवळच्या खदाणी तपासत होता, त्यावेळी त्याला एक बंद दरवाजा आढळला. त्यामधून तो आत गेल्यावर त्याला एक अनोखी दुनिया दिसली. जमिनीच्या 150 मीटर खाली ही … The post अचानक लागला तळघराचा शोध; आत होती जुनी वाहने! appeared first on पुढारी.

अचानक लागला तळघराचा शोध; आत होती जुनी वाहने!

रोम ः अनेक लोकांना काही इमारतींमध्ये अचानकच काही लपलेल्या खोल्या, तळघर सापडत असतात. इटलीतील मॅपल्स शहरातही असाच प्रकार घडला. तेथील एका व्यक्तीला अचानकच असे एक भले मोठे तळघर सापडले. तो त्याच्या घराजवळच्या खदाणी तपासत होता, त्यावेळी त्याला एक बंद दरवाजा आढळला. त्यामधून तो आत गेल्यावर त्याला एक अनोखी दुनिया दिसली. जमिनीच्या 150 मीटर खाली ही वेगळीच दुनिया होती जिथे जुन्या काळातील अनेक दुचाकी, चार चाकी वाहने ठेवलेली होती!
मॅपल्समधील लोकांना बराच वेळा आपल्या जुन्या घरांखाली रोमन काळातील खजिने सापडत असतात. त्यामुळे मुद्दामच असे काही शोधणार्‍यांचीही संख्या तिथे मोठी आहे. 2012 मध्ये काही सरकारी अधिकारी तेथील खाणी, भुयारांची पाहणी करीत होते. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने आपल्याला एक जुने भुयार सापडल्याचे सांगितले. शेकडो वर्षांपासून बंद असलेल्या या तळघरात व्हिंटेज कार आणि दुसर्‍या महायुद्धात वापरलेल्या अनेक वस्तुंचे अवशेष सापडले.
जुने टीव्ही, रेफ्रि जरेटरही याठिकाणी होते. सन 1853 मध्ये सिसिली, बोरबॉनचे तत्कालीन राजे फर्डिनंड द्वितीय यांनी ही इमारत बांधली होती. तिला सध्या ‘गॅलेरिया बोरबॉनिका’ असे म्हटले जाते. 1930 च्या दशकात या इमारतीमधील भव्य तळघरांचा वापर जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी केला जाऊ लागला. कालांतराने या तळघरांची माहिती लोकांच्या स्मरणातून गेली होती.
Latest Marathi News अचानक लागला तळघराचा शोध; आत होती जुनी वाहने! Brought to You By : Bharat Live News Media.