112 व्या वर्षी आजीबाईंना हवा आहे जीवनसाथी!
क्वालालंपूर ः अनेकांचे नेत्र वयाची चाळीशी गाठली तरी पैलतीराला लागत असतात. अशा वेळी प्रचंड जिजीविषा (जगण्याची इच्छा) असलेले अनेक लोक प्रेरणादायक ठरतात. काही लोक तर शंभरी पार केल्यावरही जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा आनंद घेत असतात. 104 वर्षे वयातही स्कायडायव्हिंग करणार्या एक आजीबाई होत्या. मलेशियात तर 112 वर्षे वयाच्या एक आजीबाई आहेत. त्यांना आता या वयातही लग्न करण्याची इच्छा आहे!
या आजीबाईंचे नाव सीती हावा हुसैन असे आहे. त्यांनी आतापर्यंत सातवेळा लग्न केले आहे. मात्र, आताही कुणी लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तर मी नकार देणार नाही असे त्या सांगतात. अर्थातच हे त्यांनी गंमतीने सांगितले! इतके वय असूनही त्या अद्याप स्वतःची कामे स्वतःच करतात व तेही चपळाईने.
त्यांचा धाकटा मुलगा 58 वर्षे वयाचा आहे. त्याने सांगितले, त्यांची आई योग्य आहार घेते आणि दररोज नियमितपणे डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेते. आपल्या आरोग्याची त्या नीट काळजी घेत असतात. त्यांची स्मरणशक्ती आता थोडी कमजोर झाली असली तरी अद्यापही त्या मुलांना व नातवंडांना जुन्या गोष्टी सांगत असतात. या आजीबाईंना पाच मुले आहेत. तसेच 19 नातवंडे आणि 30 परतवंडे आहेत.
Latest Marathi News 112 व्या वर्षी आजीबाईंना हवा आहे जीवनसाथी! Brought to You By : Bharat Live News Media.