भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला ‘सामना’ लांबणीवर!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला सामना, असे ओळख झालेली चंदीगड महापौर पदाच्‍या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणूक अधिकार्‍यांची प्रकृती बिघडल्‍याने आज (दि.१८) होणारी मतदान प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याच्‍या निषेधार्थ आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्‍या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयाबाहेर निदर्शने केली. (Chandigarh mayor election) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीतील काँग्रेस … The post भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला ‘सामना’ लांबणीवर! appeared first on पुढारी.
भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला ‘सामना’ लांबणीवर!


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला सामना, असे ओळख झालेली चंदीगड महापौर पदाच्‍या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणूक अधिकार्‍यांची प्रकृती बिघडल्‍याने आज (दि.१८) होणारी मतदान प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याच्‍या निषेधार्थ आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्‍या नगरसेवकांनी महापालिका कार्यालयाबाहेर निदर्शने केली. (Chandigarh mayor election)
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे चंदीगड महापौर निवडणुकीत भाजप विरुद्ध एकत्र आले आहेत. , आम आदमी पार्टी (आप) महापौरपदासाठी तर काँग्रेस वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी लढणार आहे. ३५ नगरसेवकांची संख्‍या असणार्‍या चंदीगड महानगरपालिकेत भाजपचे १४ तर आम आदमी पार्टीचे १३ आणि काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत. तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. (Chandigarh mayor election)
Chandigarh mayor election : आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची निदर्शने
चंदीगड महापौरपदासाठी आज मतदान होणार होते. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्‍यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलासह चंदीगड पोलिसांचे 600 कर्मचारी सेक्टर-17 येथील महापालिका कार्यालयात तैनात करण्यात आले आहेत. दरम्‍यान नामनिर्देशित पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांची प्रकृती बिघडल्‍याचा संदेश प्रसारित झाल्यानंतर महापालिका कार्यालयाबाहेर आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी  निदर्शने सुरू केली. निवडणुका पुढे ढकलल्या जातील हे भाजपला माहीत असल्याचा आरोप त्‍यांनी केला आहे.

VIDEO | Chandigarh mayoral polls 2024: “I have been informed that we (Congress workers and councillors) are not being allowed to go inside (the Chandigarh Municipal Corporation office) because the presiding officer is not well and has been hospitalised. They (BJP) want to stop… pic.twitter.com/QIqF4ARWtU
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2024

The post भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडीचा पहिला ‘सामना’ लांबणीवर! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source