गोवा : कोलवाळ कारागृहातून १३ मोबाईल जप्त

पणजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : वेगवेगळ्या घटनांमुळे कायम चर्चेत असलेले कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोलवाळ या कारागृहातील कैद्यांकडून १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तुरुंग प्रशासनाने बुधवारी १७ जानेवारी सकाळी कारागृहातील सर्व विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी हे मोबाईल फोन सापडले.
यावेळी एनडीपीएस सेल व इतर सेलमधून हे फोन ताब्यात घेण्यात आले. अंडरट्रायल कैद्यांचा सेल व महिला सेलमध्ये मोबाईल फोन आढळून आले नाहीत. तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांच्या नेतृत्वाखाली ही झडती घेण्यात आली. झाडाझडतीवेळी सापडलेले मोबाईल फोन कैदी वापरत होते संबंधित कैद्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.
Latest Marathi News गोवा : कोलवाळ कारागृहातून १३ मोबाईल जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
