अयोध्येतून आलेल्या अक्षताचे काय करावे?
अयोध्येतून देशातील गावागावांत, घराघरांत प्राणप्रतिष्ठेचे आवतन म्हणून अक्षता पाठविण्यात येत आहेत. या अक्षता भाग्यवृद्धीच्या द़ृष्टीने मूल्यवान असल्याचे कासगंज तीर्थक्षेत्र सोरो येथील ज्योतिषाचार्य डॉ. गौरव दीक्षित यांनी म्हटलेले आहे. हळदीत रंगविलेले तांदूळ देऊन निमंत्रण देण्याची प्राचीन भारतीय परंपरा आहे. हिंदू धर्मात कुठलेही पवित्र कार्य अक्षतेशिवाय पूर्ण होत नाही.
अयोध्येच्या अवतनाच्या अक्षता लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवावेत. तांदूळ शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. शुक्र ग्रहापासूनच धन वैभव लक्ष्मी तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात, असे ज्योतिषाचार्य दीक्षित यांचे म्हणणे आहे. असे केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्ही सक्रिय होतील व लक्ष्मीयोग निर्माण करतील.
अक्षतांसह खीर बनवून त्याचा प्रसाद ग्रहण करणेही भाग्योदय करणारे ठरेल.
शुभकार्यासाठी निघताना अक्षता मस्तकावरील टिळ्यात लावणेही लाभदायक ठरेल.
घरी आलेली सून पहिल्यांदा स्वयंपाक करत असेल, तर तिने अक्षतातील तांदळाचा वापर केल्यास तेही भाग्याचे ठरेल.
ज्या मुलींचा विवाह होऊ घातलेला आहे, त्यांचे वडील मुलीचे कन्यादान या अक्षतांनी करू शकतील. यामुळे ज्या घरात मुलगी सून म्हणून जाईल, त्या घराचे चांगभले होईल, असेही ज्योतिषाचार्य दीक्षित यांनी सांगितले.
रामलल्लाच्या मूर्तीचा गर्भगृहात प्रवेश
अयोध्येत नव्याने उभारण्यात राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली आहे. गर्भगृहातील प्रतिष्ठापना विधीअंतर्गत श्री रामलल्लाची एक मूर्ती बुधवारी श्रीराम जन्मभूमी संकुलात आणण्यात आली होती. त्यानंतर मूर्तीचे पालखीमधून मंदिर परिसरात भ्रमणही पार पडले होते. नगरभ्रमणही झाले. शरयू तटावरून मंदिरापर्यंत महिलांची कलशयात्राही काढण्यात आली होती. दरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली.
हेही वाचा :
बालकाण्ड भाग १ : श्रीराम प्रभू जन्म
अयोध्येत आजपासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेशी जुळतील 60 कोटी लोक!
The post अयोध्येतून आलेल्या अक्षताचे काय करावे? appeared first on Bharat Live News Media.