आता पाकचा इराणवर एअरस्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त?

पुढारी ऑनलाईन : इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील ग्रीन माऊंटन भागातील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने इराणच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत, असे वृत्त अनेक पाकिस्तानी सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडे टीव्हीने दिले आहे. बलुचिस्तान प्रांतात इराणने केलेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली … The post आता पाकचा इराणवर एअरस्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त? appeared first on पुढारी.

आता पाकचा इराणवर एअरस्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त?

Bharat Live News Media ऑनलाईन : इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील ग्रीन माऊंटन भागातील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने इराणच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत, असे वृत्त अनेक पाकिस्तानी सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडे टीव्हीने दिले आहे. बलुचिस्तान प्रांतात इराणने केलेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. (Pakistan-Iran border tensions)
पाकिस्तानने इराणमध्ये हल्ले केले आहेत, असे वृत्तही एएफपी न्यूज एजन्सीने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
पाकिस्तानने बुधवारी त्यांच्या भूभागावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याबद्दल इराणचा निषेध केला. इराणच्या या हल्ल्यात बलुचिस्तानमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला त्याच्या सार्वभौमत्वाचे आणि हवाई क्षेत्राचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पाकिस्तानने दिला होता.
पाकमध्ये हवाई हल्ला केल्याचे वृत्त मंगळवारी मध्यरात्री इराणच्या ‘इर्ना’ या सरकारी माध्यम संस्थेने आपल्या पोर्टलवर दिले; पण नंतर काही वेळाने ते काढून टाकले. अर्थात, तत्पूर्वी ही बातमी जगभर पसरली होती. दरम्यान, इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले असून, त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. इराणच्या राजदूतालाही पाकने समन्स बजावले असून, आपल्या संतप्त भावना कळविल्या आहेत. दुसरीकडे, ‘तस्नीम’ या इराणमधील वृत्तसंस्थेने आपल्या संकेतस्थळावर पाकिस्तानवरील हल्ल्याची बातमी दिली आहे.
मंगळवारी इराणने केलेल्या हल्ल्याची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कबुलीही दिली. त्यांनी दावा केला की या स्ट्राइकचा उद्देश जैश अल-अदलला लक्ष्य करणे हा होता. जो इराणला दहशतवादी संघटना मानतो. जैश उल-अदल अथवा “आर्मी ऑफ जस्टिस” हा २०१२ मध्ये स्थापन झालेला एक सुन्नी दहशतवादी गट आहे, जो मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडे कार्यरत आहे.
दरम्यान, पाकिस्तानने इस्लामाबादेतील इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे फर्मान सोडले आहे. तेहरानमधील आपल्या राजदूतालाही पाकने तडकाफडकी परत बोलावून घेतलेले आहे. तर इराणने सीमेलवर लष्कराची जमवाजमव वाढविली आहे. दहशतवाद्यांची ढाल करून पाकिस्तानने इराणविरुद्ध प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. (Pakistan-Iran border tensions)
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताज बलोच यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला की दोन्ही देशांमध्ये विविध पातळीवर संवाद सुरु असतानाही हा हल्ला झाला.
इराणच्या सीमेजवळील सब्ज कोह गावाजवळ नुकत्याच झालेल्या हल्ल्याने आता इराण आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव वाढला आहे.

Pakistan has conducted strikes inside Iran, reports AFP News Agency citing Pakistan intelligence official
— ANI (@ANI) January 18, 2024

#BREAKING Pakistan has conducted strikes inside Iran, Pakistan intelligence official says pic.twitter.com/3l6BGX0FT0
— AFP News Agency (@AFP) January 18, 2024

हे ही वाचा :

इराणचा पाकवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, दहशतवादी तळ उद्ध्वस्त
 थायलंडमध्ये फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात २३ जणांचा होरपळून मृत्यू
पाकला तडाखा..! आजवर किती देशांनी पाकिस्‍तानमध्‍ये घुसून केले हल्‍ले?

 
Latest Marathi News आता पाकचा इराणवर एअरस्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त? Brought to You By : Bharat Live News Media.