कोल्हापूर : दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू

सावर्डे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : पिराचीवाडी (ता. कागल) येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. कु. आराध्या (वय 6) व आरोही सुरेश भोसले (9) अशी दोघींची नावे आहेत. आराध्या अंगणवाडीत शिकत होती, तर आरोही तिसरीत शिकत होती. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आराध्या व आरोही यांना घेऊन आई अश्विनी शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी … The post कोल्हापूर : दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

कोल्हापूर : दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू

सावर्डे बुद्रुक; Bharat Live News Media वृत्तसेवा : पिराचीवाडी (ता. कागल) येथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. कु. आराध्या (वय 6) व आरोही सुरेश भोसले (9) अशी दोघींची नावे आहेत. आराध्या अंगणवाडीत शिकत होती, तर आरोही तिसरीत शिकत होती.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आराध्या व आरोही यांना घेऊन आई अश्विनी शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. थोड्या वेळाने दोन्ही मुलींना घरी जाण्यास सांगितले. उसाला पाणी पाजून झाल्यानंतर आई अश्विनी घरी गेल्या. मात्र, दोन्ही मुली घरी नसल्याचे समजले. गावात बराच वेळ लोकांनी शोधाशोध केल्यानंतरही मुली सापडल्या नाहीत. दरम्यान, विहिरीवर दोन्ही मुलींची चपले दिसली. त्यामुळे विहिरीत उतरून शोध घेतला असता, दोघींचे मृतदेह सापडले. घटनास्थळावर कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. वडील सुरेश भोसले हे साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. या घटनेने पिराचीवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.