माझ्यासह आ. प्रणितींना भाजप प्रवेशाची ऑफर : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून मला आणि आ. प्रणिती शिंदे यांना ऑफर असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूरचे राजकीय वातावरण निवडणुकीआधीच ढवळून निघाले आहे.
सोलापूर लोकसभेसाठी आ. प्रणिती शिंदे यांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होेते. त्या अनुषंगाने ते ठिकठिकाणी हुरडा पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन चाचपणी करीत आहेत. अशाच एका कार्यक्रमात शिंदे यांनी भाजपकडून मला व आ. प्रणितींना ऑफर असल्याचे सांगितले.
पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती…
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी माजी केद्रीय गृहमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सुशीलकुमार शिंदे यांना नाट्य संमेलनाविषयी खूप अनुभव आहे. 88 व्या नाट्य संमेलनावेळी ते स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली असून, ही भेट राजकीय नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
Latest Marathi News माझ्यासह आ. प्रणितींना भाजप प्रवेशाची ऑफर : सुशीलकुमार शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.
