देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा : राहुल गांधी

कोहिमा; वृत्तसंस्था : देशासाठी ईशान्य भारतही अत्यंत महत्त्वाचा असून नागालँडमधील समस्यांवर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केले. भारत जोडो न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी त्यांनी कोहिमा येथे स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. ईशान्य भारताचे महत्त्व अबाधित आहे आणि ते यापुढेही राहणार आहे. या भागांत … The post देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा : राहुल गांधी appeared first on पुढारी.

देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा : राहुल गांधी

कोहिमा; वृत्तसंस्था : देशासाठी ईशान्य भारतही अत्यंत महत्त्वाचा असून नागालँडमधील समस्यांवर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केले. भारत जोडो न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी त्यांनी कोहिमा येथे स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
ईशान्य भारताचे महत्त्व अबाधित आहे आणि ते यापुढेही राहणार आहे. या भागांत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असली तरी त्यामुळे ईशान्य भारताचे महत्त्व कमी होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, माझा धर्म हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा देशात धार्मिक एकोपा आणि सामाजिक समरसता नांदणे याला सर्वाधिक महत्त्व आहे.
The post देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा : राहुल गांधी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source