अमरावती जिल्ह्यातून ५०० किलो कुंकू अयोध्येस जाणार

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्या लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातून रुख्मिनीचे माहेरघर श्रीक्षेत्र कौडण्यापूर येथील मठाधीश राजेश्वर माऊली व जितेंद्रनाथ महाराज या दोघांना आमंत्रण देण्यात आले आहे. आज सायंकाळी अमरावतीच्या राजकमल चौकात कुंकूम कलश ठेवण्यात आला . यात अमरावती जिल्ह्यातून ठिकठिकाणी वरून कुंकू आले असून या कलशमध्ये ते कुंकू टाकण्यात आले आहेत. एकंदर 500 किलो कुंकू अयोध्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी दिली.
Latest Marathi News अमरावती जिल्ह्यातून ५०० किलो कुंकू अयोध्येस जाणार Brought to You By : Bharat Live News Media.
